तळेगाव दिघे – आजमपूरचे पोलीस पाटील कांदळकर निलंबित

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे (आजमपूर) येथील कामगार पोलीस पाटील अनिल रावजी कांदळकर यांच्याविरोधात शासकीय कामकाजा मध्ये हलगर्जीपणा केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशी केली या चौकशीमध्ये अनिल कांदळकर हे दोषी आढळल्याने त्यांना संगमनेर उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी निलंबित केले आहे.

कांदळकर हे पोलीस पाटील म्हणून आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्रशासनाकडे दाखल होत होत्या. या तक्रारींची दखल घेत संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार तसेच संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक यांना दिले होते. त्यांनी कांदळकर यांच्या बाबत सखोल चौकशी केली. चौकशीत कांदळकर यांच्या कामकाजातील त्रुटी आणि निष्काळजी पणा स्पष्टपणे समोर आला. शासकीय कर्तव्य पार पाडण्यात झालेल्या या गंभीर त्रुटीमुळे प्रशासनाने कठोर चौकशी अहवालाच्या आधारे उप विभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी कांदळकर यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. 

या कारवाईमुळे तालुक्यातील प्रशासनिक यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरा तील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारींवर तत्पर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!