संगमनेरात कत्तलखान्यावर पुन्हा एलसीबी चा छापा…!
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरात सुरू असलेली गोवंश कत्तल थांबण्याचे नाव घेत नसून अवैध कत्तलखान्यांमधून कत्तली सुरूच आहेत. संगमनेर शहर पोलीस स्टेशन कडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने शहराच्या कादरी नगर परिसरात छापा टाकून 8 लाख 55 हजार रुपये किमतीचे गोमांस व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ महादेव गुट्टे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, विजय पवार, योगेश कर्डीले, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ चालक उत्तरेश्वर मोरे या पथकाने ही कारवाई केली आहे.
पथकास गुप्त बातमीदारामार्फत कादरीनगर गल्ली नं.1 येथील मोकळ्या प्लॅट मध्ये अतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी (रा. मोगलपुरा संगमनेर) हा साथीदारासह गोवंशीय जनावरांची कत्तल करुन टेम्पोमध्ये भरत असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ छापा टाकला असता काही जण निळ्या रंगाच्या टेम्पोजवळ उभे असलेले दिसून आले. त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते गल्ली बोळामध्ये पळून गेले.

1) फैज अश्पाक कुरेशी (वय-24 वर्षे रा. गल्ली नं.01 मदिनानगर संगमनेर) तर पळून गेलेल्या आरोपींची नावे 2) अतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी रा.मोगलपुरा संगमनेर (फरार), 3) सलिम रियाज कुरेशी रा.कादरीनगर गल्ली नं.01 संगमनेर (फरार) अशी आहेत.
आरोपीच्या ताब्यातून 2 लाख 55 हजार – रुपये किमतीचे 850 किलो गोमांस, 6 लाख -रु कि.चा एक टाटा टेम्पो असा एकुण 8 लाख 55 हजार – रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) सह प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5(ब),5(क), 9, प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
