निधी मिळाला नाही, तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक करणार – आमदार सत्यजीत तांबे

नगरपालिकेने 2018 मध्येच प्रस्ताव केला, जे आता स्मारकाची मागणी करतात ते त्यावेळी कुठेच नव्हते…

संगमनेर | प्रतिनिधी 

संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांची इच्छा आहे. याकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 2018 मध्ये नगरपालिकेने याबाबत प्रथम प्रस्ताव केला. जे आता स्मारकाची मागणी करतात ते त्यावेळी कुठेच नव्हते. या स्मारकासाठी शासनाकडे निधीची मागणी आहेच. अन्यथा शासनाच्या मदतीशिवाय लोकवर्गणी, नगरपालिका, आमदार निधी, जिल्हा विकास नियोजन या माध्यमातून संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी जाहीर केले आहे.

संगमनेर बसस्थानक येथे संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने ‘कसे असावे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक’ याबाबत नागरिकांची मत नोंदणी शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, नगरसेवक विश्वास मुर्तडक, सौरभ कासार, भारत बोऱ्हाडे, नितीन अभंग, सीमा खटाटे, दिलीप पुंड, अर्चना दिघे, शोभा पवार, प्राची काशीद, किशोर पवार, डॉ.अनुराधा सातपुते, वनिता गाडे, गजेंद्र अभंग, दिपाली जीवन पांचारीया, गणेश गुंजाळ, अमजद पठाण, विजया गुंजाळ, अमर कतारी, सरोजना पगडाल, किशोर टोकसे, प्रियंका शहा, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण, डॉ.दानिश खान यांच्यासह संगमनेर मधील विविध पक्षांचे व विविध सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार तांबे म्हणाले की, संगमनेर मधील हायटेक बसस्थानकासमोर मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वप्रथम पाठपुरावा केला. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये नगरपरिषदेने याबाबत सर्वप्रथम ठराव केला. जे आता स्मारकाची मागणी करता ते त्या वेळेस कुठेच नव्हते. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर माजी मंत्री थोरात यांनी या कामाला गती दिली. 2023 मध्ये आपण तत्कालीन परिवहन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराजांच्या स्मारकासाठी बसस्थानकावर राज्यात प्रथम जागा मंजूर करून घेतली. यासाठी निधी देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र आता शासनाने निधी दिला नाही तर शासनाच्या मदतीशिवाय लोकवर्गणी, नगरपरिषद, आमदारनिधी, जिल्हा नियोजन समिती या माध्यमातून येत्या वर्षभरामध्ये भव्य स्मारक उभारणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते. 18 पगड जाती व बारा बलुतेदारांचे स्वराज्य त्यांनी निर्माण केले. महाराजांनी स्वतःचे महाल उभारले नाही परंतु गडकिल्ले हेच त्यांचे महाल आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाची अस्मिता आहेत. त्यांचे भव्य स्मारक संगमनेर मध्ये पूर्ण करणार आहोत.

संगमनेर सेवा समितीला संगमनेर मधील नागरिकांनी भरभरून यश दिले आणि या सेवा समितीच्या सर्व नगरसेवकांनी पहिल्याच बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याचा ठराव पारित केला. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. महाराजांच्या स्मारकाबाबतही सर्व नागरिकांच्या मताचा आदर करून जनतेला जसे हवे आहे तसे भव्य स्मारक उभारण्यात येईल असे आमदार सत्यजित तांबे यांनी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!