संगमनेरमध्ये खतमुल कुरआन सोहळा उत्साहात संपन्न !….
26 वर्षांपासून सुरू आहे उपक्रम…
संगमनेर | प्रतिनिधी :
अलहम्दुलिल्लाह, Hazrat Kadar Badsha Qadri Masjid येथे गेल्या 26 वर्षांपासून सुरू असलेला 10 दिवसीय खतमुल कुरआनचा पवित्र कार्यक्रम यंदाही मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. पहिल्या अशऱ्यातील 10 तरावीहमध्ये पूर्ण कुरआन शरीफ ऐकविण्यात आला. संगमनेर शहर व परिसरातील मोठ्या संख्येने युवक व नमाजी उपस्थित राहून नमाज अदा करत होते.

खतमुल कुरआन प्रसंगी हाफिज अहमद बरकाती यांनी कुरआन शरीफाचे पठण केले. यावेळी ट्रस्टींच्या वतीने हाफिज अहमद बरकाती यांची गुलपोशी करण्यात आली तसेच मुक़्तदी व ट्रस्टी मंडळाच्या वतीने १ लाख १० हजार रुपयांचे नजराणे आणि वस्त्र भेट देण्यात आली.

मस्जिदचे इमाम मौलाना रेहान रजा तसेच मदरशाचे नाजिम-ए-आला मौलाना हाफिज मुनव्वर साहेब यांनाही वस्त्र भेट देऊन त्यांची गुलपोशी करण्यात आली. त्याचबरोबर कादरी खानदानातील हाफिज विरद सय्यद, मौलाना वसील सय्यद आणि हाफिज फाजिल सय्यद यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन व देखरेख ट्रस्टी मंडळातील सय्यद अब्दुल सलाम कादरी, सय्यद अब्दुल अलीम कादरी, सय्यद अब्दुल रकीब कादरी (शहर काजी) आणि सय्यद मोहातसिब अब्दुल कलाम कादरी यांनी केली.

नजराण्यात गरीब नवाज–चांद शावली ग्रुप, लखीमपुरा ग्रुप, गवंडीपुरा ग्रुप, मदिना नगर ग्रुप, मोमिनपुरा ग्रुप, तीन बत्ती चौक ग्रुप आणि दोस्ती ग्रुप यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या 10 दिवसांत नमाज्यांसाठी जेवणाची व्यवस्था कादरी बिरादरान व रजा-ए-कादरी कमिटी (कादरी फॅमिली) यांच्या वतीने करण्यात आली.

सेवाकार्यात अझहर कादरी, फखीम कादरी, दिलमेर कादरी, जामील कादरी, मन्नान कादरी, नजीब कादरी, नूरो भाई, इमरान बागवान, काशिफ खान, आसिफ भाई, सोहेल भाई, मुस्तकीम भाई, साहिल सय्यद, मोहसिन भाई, इमरान फिटर, अल्ताफ, शोएब, कैफ भाई, हसनैन, तोहिद, फैसल, बख्तियार, काशान तसेच इतर युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
संपूर्ण कार्यक्रम धार्मिक वातावरणात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि भाईचाऱ्याच्या भावनेत यशस्वीरीत्या पार पडला.
