म्हाळुंगी नदीवरील पुलाचे काम लवकर पूर्ण करा — आमदार अमोल खताळ

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 29

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित अपूर्ण काम १० जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपरिषद प्रशासनास व संबंधित ठेकेदारास दिले आहेत.

स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या दरम्यान असणाऱ्या पुलाच्या कामाची पाहणी आमदार खताळ यांनी केली. त्यावेळी त्यांच्या समवेत मुख्याधिकारी रामदास कोकरे, ॲड. श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, कैलास वाकचौरे, शिरीष मुळे, कैलास लोणारी, अविनाश थोरात दगाबाई धात्रक, अल्पना तांबे, विनोद सूर्यवंशी, कैलास कासार, प्रशांत वाडेकर, निलेश कोंतम, लखन घोरपडे, विकास डमाळे दिलीप अनाप, शशांक नामन, सौरभ देशमुख, वरद बागुल, आश्विन परदेशी, सनी धारणकर, कृष्णा हासे तसेच साईनगर, घोडेकर मळा पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खताळ म्हणाले की, म्हाळुंगी नदीवरील पूल पडल्यामुळे या परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले आहे. थोडेफार काम अपूर्ण राहिले आहे आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात येईल.

दिगंबर गणेश सराफ विद्यालय व ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या पुलामुळे आता दिलासा मिळेल. मागील ३ ते ४ वर्षे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. १६ जूनपासून शाळा सुरू होत असून, नवीन पुलावरून शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात येईल. मागील लोकप्रतिनिधींनी या भागाकडे दुर्लक्ष केले. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून आता या परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!