अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करावेत

आमदार अमोल खताळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

 संगमनेर प्रतिनिधी दिनांक 20 

– संगमनेर तालुक्यात मागील चार पाच दिवसांपासून मान्सून पूर्व वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकाचे तसेच घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करावेत असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

संगमनेर तालुक्यात शेतकरी खरीप पूर्व शेतीची मशागत करण्यात गुंतलेला असताना अचानक चार ते पाच दिवसापासून वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेला कांदा, भाजीपाला, फळपिके,चारा यासह वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वादळ वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेले आहेत. तर काहींची घरे पडली आहे.यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.

अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी फलदायी न ठरता नुकसानकारकच ठरला आहे. या सर्व नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे शेत पिकांचे तसेच घरांचे, गोठ्यांचे त्वरित पंचनामे सुरू करावेत अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!