दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरात मशाल मोर्चा

संगमनेर | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज, बुधवार (२२ जुलै) रोजी सायंकाळी ६ वाजता संगमनेर बस स्थानक येथून भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. समविचारी प्रवाह, संगमनेर यांच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात येणार असून विविध सामाजिक, राजकीय संघटना, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

आयोजकांच्या माहितीनुसार, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून आंदोलन सुरू होते. २० जुलै रोजी संसदेकडे शांततेच्या मार्गाने निघालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा असून देशभरातून या कारवाईचा निषेध व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत, ही देशाच्या लोकशाही इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मशाल मोर्चात सर्व समविचारी पक्ष, सामाजिक संघटना, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

मशाल मोर्चा

📍 स्थळ: संगमनेर बस स्थानक

🗓️ दिनांक: बुधवार, २२ जुलै २०२६

🕕 वेळ: सायंकाळी ६.०० वाजता

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!