थोरात साखर कारखान्याच्या वतीने संगमनेर बसस्थानकाची स्वच्छता

संगमनेर प्रतिनिधी दि. 6 —

महाराष्ट्रातील आदर्शवत असलेल्या संगमनेर बसस्थानकाची स्वच्छता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेच्या मदतीने केल्याने हा परिसर स्वच्छ चकचकीत झाला आहे.

संगमनेर बस स्थानक हे शहरातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण आहे. प्रवाशांची या ठिकाणी सातत्याने मोठी वर्दळ असते. या सर्व प्रवाशांना चांगली सुविधा व्हावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कार्यकाळात अत्याधुनिक बस स्थानक निर्माण करून घेतले आहे. सर्व सुविधा, त्याचप्रमाणे शॉपिंग कॉम्प्लेक्स असल्याने बस स्थानक परिसरात तालुक्यातून व शहरातून आलेल्या नागरिकांचा मोठा वावर असतो.

बस स्थानकाचा परिसर मोठा असल्याने नागरिकांच्या वर्दळी मधून या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. येणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रसन्न वातावरण मिळावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या फायर फायटर उपलब्ध करून देण्यात आले. या माध्यमातून सर्व बस स्थानक परिसर धुवून स्वच्छ करण्यात आला. प्रवाशांसाठी अत्यंत प्रसन्न व स्वच्छ वातावरण या ठिकाणी निर्माण झाले.

संगमनेर बस स्थानकाचा परिसर मोठा असून नागरिकांची मोठी संख्या या ठिकाणी असते. सर्व चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असते. या परिसराच्या स्वच्छतेसाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी येथे येऊन सर्व परिसर धुवून साफ करण्यास मोठी मदत केली आहे. सामाजिक उपक्रमातून यामधील सहभागाबद्दल आम्ही कारखाना प्रशासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो- प्रशांत गुंड पाटील, आगार प्रमुख, संगमनेर बस स्थानक

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!