सगमनेर तालुक्यातील ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा
शेती पंपाची वीज आठ तास द्या !
कोकणगाव, शिवापुर, मेंढवन येथील ग्रामस्थ आक्रमक
संगमनेर प्रतिनिधी दि. 5
महिन्यात दोन हप्ते दिवसा आणि रात्रीचा एक हप्ता किंवा शेतीपंपाची लाईट दिवसाची आठ तास न दिल्यास शनिवार 8 मार्च रोजी बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संगमनेर तालुक्यातील कोकणगाव, शिवापूर आणि मेंढवन या गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.

कार्यक्षेत्रात शेतीपंपाची दिवसाची लाईट तीन ते चार तास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रात्रीच्या वेळी शेती पंपाची लाईट गेली तर घरापासून शेती लांब असल्यामुळे रात्री शेतीला पाणी देण्यासाठी मोठ्या मनस्तापला सामोरे जावे लागते. तसेच वन्य प्राणी (बिबट्या, तरस, साप ) अशा हिंस्र प्राण्यांची भीती त्यामुळे महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

या सर्व परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला असून संगमनेर तालुका पोलीस आणि वीज वितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी दीपक जोंधळे, रमेश शिंगोटे, दिलीप जोंधळे, हनुमंत भागाजी जोंधळे, सोमनाथ जोंधळे, सतीश जोंधळे उपस्थित होते. तसेच निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
