संगमनेरच्या अवैधकत्तलखान्यांचा आता जनतेच्या जीवाशी खेळ ! 

जनावरांचे सडलेले – कुजलेले मांस, हाडे, बिनकामाचे अवयव प्रवरा नदीच्या पात्राजवळ टाकले

संगमनेर ते अहिल्यानगर व्हाया श्रीरामपूर सर्वच अधिकारी अधिकारी हप्तेखोरीत मग्न…

बजरंग दलाची कारवाईची मागणी 

संगमनेर प्रतिनिधी दि. — 4

अवैध कत्तलखान्यातले जनावरांचे सडके, कुजके मांस, हाडे आणि इतर अवयव प्रवरा नदी पात्राजवळ टाकून आता जनतेच्या आरोग्याशी अवैध धंदे करणाऱ्यांचा खेळ सुरू झाला आहे. याला कायमचा आळा घालण्याची गरज असून संगमनेर पासून अहिल्यानगर पर्यंत व्हाया श्रीरामपूर हप्तेखोरीत अडकलेले तथाकथित अधिकारी आणि प्रशासन ही कारवाई कधी करेल ? असा सवाल निर्माण झाला आहे.

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने, गोवंश हत्या, जनावरांची तस्करी, गोवंश मांस तस्करी या सर्व बाबी सर्रासपणे सुरू असूनही पोलीस प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नाही. त्यातच आता पोलिसांना आणि प्रशासनाला जुमानणाऱ्या आणि अवैध करतानी करणाऱ्या कत्तलखाना वाल्यांनी गोवंश जनावरांचे सडलेले, कुजके मांस हाडे बिनकामाचे अवयव हे थेट प्रवरा नदी जवळील पात्रात एका जमिनीत उघड्यावर टाकल्याने यातून निघणारे दुर्गंधीयुक्त द्रव पदार्थ नदीच्या पाण्यात मिसळून जनतेच्या आरोग्यास थेट धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हा सर्व प्रकार संगमनेर बजरंग दलाने उघडकीस आणला असून छायाचित्रांसह संगमनेर नगरपालिकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यानंतर जागे झालेल्या नगरपालिका प्रशासनाने पोलिसांना पत्र दिले आणि मग संगमनेर शहर पोलिसांनी दोघाजणांवर गुन्हा दाखल केला असला तरी असे आरोग्य घातक उद्योग करणे थांबणार नसून शहरात विविध ठिकाणी असे कत्तलखान्यातले मटन, चिकन शॉप मधील इतर दुर्गंधीयुक्त मांस सुद्धा टाकले जात असल्याचे चित्र आहे.

बजरंग दलाने या संदर्भात संगमनेर नगरपालिकेला निवेदन देऊन थेट नदीपत्रालगत असलेली जमीन ही कोणाची आहे याची देखील नावे दिले आहेत त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नगरपालिकेचे नेहमीच दुर्लक्ष… 

संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे हे अतिक्रमण हटाव आणि कचरा नियोजनासाठी पुढाकार घेत असले तरी इतरही अवैध बाबींवर कारवाई करणे हे नगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याचे त्यांना ज्ञात करून द्यावे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

कत्तलखाने वाढण्यास आणि त्याचे वेळोवेळी संगोपन होण्यास आणि त्याला वेळोवेळी वेगवेगळ्या परवानग्या देण्यास नगरपालिका जबाबदार आहे. कत्तलखाने जनावरांचे मांस दुर्गंधीयुक्त हाडे फेकण्यास आणि नष्ट करण्यास आवश्यक असलेले जनावरांचे अवयव उघड्यावर टाकण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. हे नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहित आहे. तरीही कुठलीही कारवाई स्वतः पुढाकार घेऊन नगरपालिकेने केलेले नाही. नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर नगरपालिका जागे होते असे नेहमीच दिसून आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!