संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे…
संगमनेर बचाव कृती समितीचे धरणे आंदोलन
संगमनेर प्रतिनिधी दि. 1
संगमनेर अपर तहसील कार्यालय पठार भागातील घारगाव किंवा पठारातील जनतेच्या सहमतीने ठरलेल्या जागेवर व्हावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी आज संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालया समोर संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
संगमनेर शिवसेना (ठाकरे गट) यांनी या आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला. तर वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षां रुपवते यांनी देखील आंदोलनास पाठिंबा दिला.

अपर तहसील कार्यालया बरोबरच संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे ही प्रमुख मागणी करण्यात आली. त्याच बरोबर पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गच नेण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
ॲड. सुहास आहेर, अजय फटांगरे, दत्ता ढगे, अमर कतारी, रवींद्र पवार, रवींद्र अरगडे आंदोलनात सहभागी झाले होते.

