छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर ; वर्षातच उभा राहणार – आमदार अमोल खताळ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण
संगमनेर प्रतिनिधी दि. 19
संगमनेर शहरातील बसस्थानकामध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व अहिल्यानगरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू होणार असून एक वर्षाच्या आत हा पुतळा बसस्थानक परिसरातच उभा राहणार असल्याचा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर करांना दिला.

आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून पत्र देण्यात आले असून त्यात वरील माहिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने लहान व मोठ्या मुला मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर चंद्रशेखर कानडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठनेते सुभाष कोथिंबिरे, भाजप ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजू, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी नगरसेवक अविनाश थोरात, शिवसेनेच्या संपर्कप्रमुख सुरेखा गव्हाणे, निलम खताळ शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, विनोद सूर्यवंशी, उपशहर प्रमुख आजीत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रवीण कानवडे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, पो नि रवींद्र देशमुख, भारत गवळी, संपत गलांडे यांच्या सह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर बस स्थानक परिसरात अश्वारूढ पुतळा व्हावा अशी संगमनेरकर जनतेची अनेक दिवसा पासूनची मागणी होती ती मागणी पूर्ण करणार असून या बसस्थानकाच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूप पुतळा होणार आहे. छत्रपतींचा मावळा म्हणून सर्वच घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची शिकवण घेऊन येथून पुढील काळात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आपण केले होते. याबाबत मी स्वतःबसस्थानक परिसरात येऊन सर्वांशीच चर्चा केली होती. त्यांना सुद्धा आपण या शिवजयंती उत्सवात सहभागी होण्याची विनंती केली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीउत्सवामध्ये सुद्धा काही जणांनी राजकारण केले.हे दुर्दैवी असल्याचे परखड मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले. असे प्रसिद्ध पत्रकार म्हटले आहे.

जयंती निमित्त अठरा वर्षाच्या पुढील मुलांच्या गटासाठी छत्रपती शिवाजी स्मारक ते घुलेवाडी फाटा आणि मुलीच्या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते संगमनेर विधी महाविद्यालय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या..या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोहित बिन्नर, द्वितीय क्रमांक ऋषिकेश वावरे, तृतीय क्रमांक दिनेश गुंजाळ, चतुर्थ क्रमांक सुनील गिऱ्हे, पंचम क्रमांक तुषार खुळे, तसेच मुलींच्या मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक खुशी हासे, द्वितीय क्रमांक प्रणाली पोटकुले, तृतीय क्रमांक सरगम कासार, चतुर्थ क्रमांक वैष्णवी खताळ आणि पंचम क्रमांक सारिका लोगोटे व पुनम वाव्हळ यांना तरलहान गट मुली श्रेया सानप, सानिका पवार, सार्थक गुंजाळ यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह तसेच आकर्षक बक्षिसे देऊन गौरव करण्यात आले.
