देवगड देवस्थानचा ब वर्गात समावेश पाच कोटीचा निधी मिळणार – आमदार खताळ
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर तालुक्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाणारे हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा देव स्थानला महायुती सरकारच्या माध्यमातून ब वर्ग दर्जा मिळाला आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे त्या निधीतून देवगड देवस्थान परिसराचा विकास होणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे.

आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली असून पत्रकात पुढे म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा देवस्थान येथे चंपाषष्ठी उत्सवनिमित्त आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते खंडोबा महाराज यांची महाआरती ।करण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, विश्वस्त काशिनाथ पावसे, उत्तमराव जाधव, मोठ्याभाऊ बडे, चंद्रशेखर गडाख, भाजप सरचिटणीस गणेश दवंगे, केशव दवंगे, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, सखाराम येरमल, सर्जेराव येरमल, दशरथ गडाख, देविदास कदम, गणेश पावसे, दादासाहेब गडाख, मच्छिंद्र गडाख, भारत गोफणे, सागर गोफणे, दीपक गुळवे, अशोक गोफणे आदी उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते खंडोबा देवस्थान गडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणाऱ्या राजे उमाजी नाईक स्मारक बांधकामाचे भूमिपूजन तसेच हिवरगाव पावसा परिसरातील विजरोहित्राचे उद्घाटन करण्यात आले

आमदार खताळ म्हणाले संगमनेर तालुक्यातील देवस्थानच्या सभा मंडपासाठी निधी मिळावा अशी मागणी केली. त्या मागणीनुसार आमदार निधीतून सर्व देवस्थानच्या सभामंडपासाठी निधी देण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्यांच्या ४० वर्षाची आणि माझ्या एक वर्षाची तुलना आता जनता करू लागली आहे. एक वर्षाच्या कालावधीत तालुक्याच्या विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला आहे.
