ठाकरेंची शिवसेना तिथीनुसार साजरी करणार भव्य शिवजयंती… 

समिती गठीत : अध्यक्षपदी गोविंद नागरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब घोडके 

संगमनेर, प्रतिनिधी दि. 25

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर्षी देखील शिवाजी जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यासाठी उत्सव समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी गोविंद नागरे तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घोडके यांची निवड करण्यात आली आहे.

तिथीनुसार येत्या १७ मार्चला शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याबद्दल चर्चा करण्यात आली. यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिवसेनेकडून दरवर्षी शिव जयंती उत्सव साजरा केला जातो. संध्याकाळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवभक्त, नागरिक देखील या मिरवणुकीत सहभागी होत असतात. यावर्षी देखील ही मिरवणूक भव्यदिव्य स्वरूपात काढली जाणार आहे.

मिरवणुकीत उंट, घोडे, रथ, ताफा, डीजे, ढोल, ताशा पथक आदिसह पारंपारिक वाद्य, पारंपारिक वेशभूषेचा समावेश असतो. संध्याकाळी नगरपरिषद प्रांगणातून निघणारी ही मिरवणूक लाल बहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी शेवटी येते. शिवजयंती उत्सवा दरम्यान संपूर्ण संगमनेर भगवेमय झालेले असते. शिवजयंती उत्सव समितीचा देखील या मिरवणुकीत सहभाग असणार आहे. शिवसेना शाखेच्या वतीने शिवनेरी वरून येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत केले जाईल.

शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समिती पदाधिकाऱ्यांचे शिवसेना संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी अभिनंदन केले. बैठकीला माजी शहर प्रमुख अमर कतारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, पंकज पडवळ, माजी शहर प्रमुख प्रसाद पवार, नितीन आनाप, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, माजी युवा तालुकाप्रमुख राजू सातपुते, ज्येष्ठ शिवसैनिक दीपक साळुंके, व्यापारी आघाडी शहर प्रमुख संभव लोढा, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय सातपुते, रंगनाथ फटांगरे, तसेच रिक्षा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना (ठाकरे) उत्सव समिती… बाळासाहेब घोडके (कार्याध्यक्ष), गोविंद नागरे (अध्यक्ष), वेणूगोपाल लाहोटी व अक्षय गाडे (उपाध्यक्ष), पप्पू कानकाटे (खजिनदार) 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!