खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी कटीबद्ध राहणार – आमदार खताळ
संगमनेर प्रतिनिधी दि. 13
हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवगड देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्या तील ब वर्ग दर्जात समावेश करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करू. तसेच या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध राहू असे आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा महाराज यात्रा उत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्तानेआयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देवगड देवस्थान ट्रस्टच्या वतीने खताळ यांचा सत्कार करण्यात आला आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी या नात्याने प्रथमच त्यांच्या हस्ते खंडोबा महाराज मल्हार मार्तंड यांचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली.

या वेळी येळकोट येळकोट जय मल्हार… बोल सदानंदाचा येळकोट असा जयजयकार करत तळी सुद्धा भरण्यात आली. आमदार खताळ म्हणाले की, देवगड खंडोबा देवस्थानचा क वर्ग दर्जात समावेश करण्यात आलेला आहे. येथून पुढील काळात या देवस्थानचा पर्यटन विकासात समावेश करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. तसेच या देवस्थाना च्या विकासासाठी येथून पुढे जी काही मदत लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध राहील.

यावेळी भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे, उपाध्यक्ष पांडुरंग गडाख, सचिव मोठ्याभाऊ बढे, खजिनदार चंद्र शेखर गडाख, माजी देवस्थानचे विश्वस्त काशिनाथ पावसे, उत्तम जाधव, गोरक्षनाथ पावसे, यादव पावसे, सुरेश पावसे, कामगार पोलीस पाटील मथाजी पावसे, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश दवंगे, केशव दवंगे, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, दादासाहेब गडाख, सोमनाथ दवंगे, मच्छिंद्र गडाख, प्रकाश पावसे, गणेश शिंदे, ओम दवंगे, विनोद पावसे, निलेश पावसे, भारत गोफणे, संजय येरमळ, रोशन येरमल यांच्यासह हिवरगाव पावसा सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व यात्रा उत्सव समिती पदाधिकारी उपस्थित होते.
