वेल्हाळे, मालदाड, खळी, आश्वी येथील देवस्थानांना ‘क’ दर्जा मंजूर करावा – आमदार सत्यजित तांबे यांची मागणी
संगमनेर दि. 5 प्रतिनिधी –
वेल्हाळे परिसरातील श्री.क्षेत्र हरीबाबा देवस्थान या ठिकाणी अनेक भाविक येत असल्यामुळे या परिसरालाही ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा तसेच मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ देवस्थान,आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थान, खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान व निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थान या तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्गाचा दर्जा मंजूर करावा अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

आमदार तांबे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे ही मागणी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालदाड येथील श्री.क्षेत्र चैतन्य मच्छिंद्रनाथ मठ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील श्री.चैतन्य महाराज देवस्थान, खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान, निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थान या चार तीर्थक्षेत्रांना क दर्जा मंजूर करावा अशी मागणी केली. निळवंडे येथील डोंगरावर असलेल्या देवस्थान दत्त महाराज चैतन्य कानिफनाथ ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा योजनेतून सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

याचप्रमाणे वेल्हाळे येथील श्री.क्षेत्र हरीबाबा देवस्थान हे प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे भौतिक सुविधांचा अभाव असल्याने अनेक भाविकांची गैरसोय होते. तसेच मंदिर परिसर विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याने या तीर्थक्षेत्राला क वर्ग देऊन मंदिर परिसराचे सुशोभीकरण व भाविकांसाठी भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत निधी मिळावा व या परिसराचे सुशोभीकरण व विकास करावा.

याचबरोबर मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ मठ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान,खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान व निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थाना ‘क’ दर्जा मिळावा व यातून सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी आहे.
