छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारकाला जिल्हा प्रशासनाचा खोडा !
अश्वारूढ पुतळ्यासाठी निधी द्या — आमदार सत्यजीत तांब
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आग्रही मागणी
असा निधी देता येत नाही — जिल्हाधिकारी
संगमनेर दि. 3 प्रतिनिधी —
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर हायटेक बसस्थानकासमोरील मध्यवर्ती जागेत व्हावा यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून जिल्हा नियोजन समिती मधून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी तातडीने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली असल्याची माहिती यशोधन या प्रसिद्धी कार्यालयातून देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ तसेच शासकीय विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

प्रसिद्धीस दिसलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे की, संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात व तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने 3 जून 2019 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर केला होता. यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी या कामी पाठपुरावा सुरू ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 21 ऑगस्ट 2023 रोजी बस स्थानकावरील एसटी महामंडळाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाला दिल्या होत्या.

दरम्यान नगरपालिकेने महाराजांच्या पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. त्याच काळात तत्कालीन पालकमंत्री विखे पाटील यांनी 16 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महाराजांच्या पुतळ्या करता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे नगरपालिकेचा प्रस्ताव मागे पडला.

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सत्यजित तांबे यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत मागील चार महिन्यांपासून या निधीबाबत कोणतीही कार्यवाही का झाली नाही असा जाब विचारला यावर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी उत्तर देताना सांगितले की अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असा निधी देता येत नाही. त्यावर काय उपाय करता येईल याबाबत आम्ही सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी एक तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सरकारने तातडीने एक कोटी रुपयांचा निधी द्यावा अन्यथा तसा निधी देता येणे शक्य नसेल तर नगरपालिकेला याबाबत कळवावे म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या नितीन मधून अश्वारूढ पुतळ्यासाठी हा निधी मिळवता येणे शक्य होईल.

यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी याबाबत आपण मुख्यमंत्री यांच्याकडे भेटून शासन स्तरावर लवकर निर्णय घेऊ असे सांगितले.
मात्र महाराजांच्या पुतळ्या करता उशीर नको म्हणून तातडीने हा निर्णय कळवावा. अशी मागणी ही आमदार तांबे यांनी केली.

शंभर फुटी तिरंगा….
हायटेक बसस्थानकाच्या समोर मध्यवर्ती जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा होणार असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सध्या असलेल्या पुतळ्याच्या जागेवर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या जागेवर शहीद स्मारक व बस स्थानकाच्या समोरील जागेत 100 फुटी तिरंगा ध्वजही उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी
