आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेरात 10 ई – टॉयलेटसाठी एक कोटींचा निधी
आमदार खताळ जनतेची दिशाभूल करीत आहेत — सोमेश्वर दिवटे
संगमनेर दि.4 प्रतिनिधी —
संगमनेर शहरात दहा एक टॉयलेट उभारण्या साठी आमदार सत्यजित तांबे यांनी प्रयत्न करून पाठपुरावा केला आहे त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी दहा कोटी रुपयांचे अनुदान देखील मंजूर झाले आहे मात्र याचे श्रेय मिळवण्यासाठी नव्याने आमदार झालेले अमोल खताळ जनतेची दिशाभूल करून हे काम आपणच मंजूर केले असल्याचे दाखवत आहेत असा आरोप काँग्रेसचे संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे

या सर्व घडामोडींचा पुरावा म्हणून दिवटे यांनी आमदार तांबे यांनी सरकारशी आणि मुख्यमंत्र्यांशी केलेल्या मागणीचा आणि पाठपुराव्याचा पत्रव्यवहारही प्रसिद्ध दिला आहे.

सोमेश्वर दिवटे यांनी म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. आमदार सत्यजित तांबे यांनी 31 जानेवारी 2024 मध्येच या कामाचा पाठपुरावा केला. त्याला नगरविकास विभागाने 21 फेब्रुवारी 2024 मध्येच मंजुरी दिली. नवीन लोकप्रतिनिधी हे 23 नोव्हेंबर 2024 नंतर झाले. जुन्या कामांच्या विकास निधीसाठी पाठपुरावा हा लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांनी केला आहे. नवीन लोकप्रतिनिधीने अर्थसंकल्पामध्ये नवीन निधी मिळवावा मग जाहिरात बाजी करावी असा टोमणा त्यांनी मारला आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी 31 जानेवारी 2024 रोजी या कामाच्या निधीसाठी जे पत्र दिले होते त्याला तत्कालीन मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मंजुरीचे पत्र सुद्धा असून ते मंजुरीचे पत्र सोशल माध्यमांवर सर्वत्र व्हायरल होत आहे.
