Oplus_131072

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बाबत मंत्री पंकजा मुंडे काय बोलल्या…

नामदेव शास्त्री यांच्या बद्दलही…

जालना दि. 2 प्रतिनिधी —

राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच वाल्मीक कराड खंडणी प्रकरण आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या वषयी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान भगवान गडावरील बाबा नामदेव शास्त्री यांच्या धनंजय मुंडे प्रकरणातील भूमिकेबाबतही त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर बीडचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराड असल्याचा आरोप होत आहे. शिवाय खंडणी वसूली प्रकरणातही कराड तुरूंगात आहे. अशा वेळी धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करतच आहेत. पण महायुतीतील घटक पक्ष ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. त्यात आता पंकजा मुंडे यांनी राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. असं असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की कुठे दबाव आहे. मला कुठेबही दबाव दिसत नाही. असं वक्तव्य करत त्यांनी थेट धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. शिवाय राजीनामा घ्यायचा की नाही हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं नकळत म्हणत त्यांनी चेंडू फडणवीस अजितदादांच्या कोर्टातही टोलवला. त्यातून त्यांनी एका दगडात दोन पक्षीही मारल्याची चर्चा होत आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नाही. दोषी नसल्यास कुणावरही अन्याय व्हायला नको असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलीय. जालन्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी पत्रकारांशी बोलत होत्या. सगळया गोष्टी तपास यंत्रणांवर अवलंबून आहेत. असं सांगत या प्रकरणात संबंध आढळून आल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

दरम्यान संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचं नामदेव शास्त्री यांनी जाहीर केलं आहे. यावर बोलताना ही त्यांची वैयक्तीक भूमिका आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडे यांचं नामदेव शास्त्री यांनी समर्थन केलं यावर प्रतिक्रिया देणं मला आवश्यक वाटत नाही असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. नामदेव शास्त्री यांच्यावर ही अधिक काही बोलण्यास पंकजा यांनी नकार दिला. (सौजन्य एनडीटीव्ही मराठी)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!