चिंचोली गुरव मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; एका रात्रीत दोन ठिकाणी घरफोड्या
प्रतिनिधी —
संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या चिंचोली गुरव या गावांमध्ये एका रात्रीत दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.
बबन भीमराज गोडगे आणि नानासाहेब त्र्यंबक गोडगे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी मध्यरात्री या दोन्हीही घरांमध्ये दरवाजे उघडून चोरट्यांनी दागिने लंपास केले आहेत. यामध्ये नानासाहेब गोडगे यांचे 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व कानातले चोरले आहेत. तर बबन गोडगे यांचे देखील 62 हजार 900 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.
