संगमनेर येथे १३ मार्चला निर्भय बनो प्रबोधन सभा !

प्रतिनिधी —

महाराष्ट्रात निर्भय बनो आंदोलनाच्यावतीने ठिकठिकाणी जाहीर सभा होत आहेत. जनतेला निर्भयपणे आपले म्हणणे मांडता यावे यासाठी वातावरण निर्मिती करणे हा या सभेचा उद्देश आहे. सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिनांक १३ मार्च, बुधवार रोजी दुपारी ३ वाजता, स्वयंवर मंगल कार्यालय, अकोले बाय पास रोड संगमनेर येथे ‘निर्भय संगमनेरकर’ आयोजित प्रबोधन सभा आयोजित केली आहे. या सभेचे प्रमुख वक्ते जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे आहेत. सभेत देशांतील राजकीय व सामाजिक परिस्थिती विषयी मार्गदर्शन आणि चर्चा केली जाईल.

संगमनेर शहर आणि तालुक्यातील स्त्री पुरूष नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. निशा शिवूरकर, डॉ. अमित शिंदे,ॲड. ज्ञानेश्वर सहाणे, बाळासाहेब घोडके, चंद्रकांत पवार, अब्दुल्ला चौधरी, अजीजभाई ओहरा, ॲड. मीनल देशमुख, शांताराम गोसावी इत्यादींनी केले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!