संतप्त शिवसैनिकांनी विधानसभा अध्यक्ष यांचे छायाचित्र असलेला बॅनर जाळला !

आमदार पात्र की अपात्र प्रकरण

प्रतिनिधी —

विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्यानंतर संतप्त झालेल्या संगमनेरच्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसैनिकांनी बस स्थानकासमोर एकत्र येत नार्वेकर यांचे छायाचित्र असलेला बॅनर जाळून जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

शिंदे गटाचे आमदार पात्र की अपात्र याबाबत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी बुधवारी निकाल दिला. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचे लक्ष लागले होते.

शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी संगमनेर बस स्थानकाजवळ एकत्र येत प्रवेशद्वारावर राहुल नार्वेकर यांचे छायाचित्र असलेल्या बॅनर वर जोड्याने मारत बॅनर जाळून जोरदार घोषणा देत निषेध केला.

यावेळी शिवसेनेचे संगमनेर विधानसभा प्रमुख कैलास वाकचौरे, उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेनेचे संघटक पप्पू कानकाटे, उपशहर प्रमुख सुदर्शन इटप, शहर संघटक समीर ओझा, अजीज मोमीन, उपतालुकाप्रमुख दत्तू नाईक, अमोल कवडे, योगेश बिचकर, संकेत गुंजाळ, राजेंद्र सातपुते, भैय्या तांबोळी आदी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!