महिला शिक्षिकांची झूम ऑनलाईन दिवाळी पाडवा पहाट !
प्रतिनिधी —
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी आयोजित व गुरुमाऊली सदिच्छा महिला आघाडीच्या तर्फे सुरेल भावगीतांनी दिवाळी पाडवा पहाट ऑनलाइन झूम द्वारे सुमधुर गीतांनी रंगली.

बापूसाहेब तांबे यांच्या संकल्पनेतून महिला शिक्षक भगिनींसाठी दीपावली पहाट पाडवा या कार्यक्रमाचे झूम मीटिंग द्वारे आयोजन करण्यात आले होते. महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्युलता आढाव व जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुषमा वाळुंज यांच्या गणेश स्तवनाने या दिवाळी पाडवा पहाटेची सुरुवात करण्यात आली. या पहाट गाण्यांसाठी बापूसाहेब तांबे, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडूंगे उपस्थित होते.

सुषमा वाळुंज (पारनेर), सुवर्णा भालसिंग (नगर), कविता मोरे (राहुरी), सुमन तिजोरे (नेवासा), अर्चना सिनारे (नगर), विना सावळे (अकोले), सुनीता उगले (संगमनेर) सविता जोरवर (अकोले), मीनाक्षी अवचारे, (नेवासा), विजया खिलारी (नगर), वैशाली गायकवाड (राहुरी), सुवर्णलता गायकवाड (श्रीगोंदा), जयश्री पोतदार (कर्जत), छाया थोरात (कोपरगाव), दिपाली कापरे (नगर), जयश्री गाडेकर (पारनेर), सुनीता राहींज (राहता), मीना गुंजाळ (अकोले), शुभांगी भालेकर (कर्जत), मंजुश्री वाळुंज (पारनेर), शबाना तांबोळी (कोपरगाव) यांनी सुमधुर गीते गायली.

याप्रसंगी मिनाक्षी अवचारे, शिक्षक बँक संचालिका सरस्वती घुले, गीता बाप्ते, प्रतिभा साबळे, शोभा लांडगे, कांता बनकर, वनिता सुंबे, निर्गुणा कापसे, मीनाक्षी निवडुंगे, नीता सूर्यवंशी, उज्वला दिघे, स्वाती झेंडे, सुजाता रामधवन, राणी साळवे, स्वाती पठारे, अर्चना तांबे, यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील शिक्षिका उपस्थित होत्या. या ऑनलाइन झूम दीपावली पाडवा पहाटेच्या आयोजनामध्ये तंत्रस्नेही शिक्षक जयेश गायकवाड व प्रवीण दिघे यांचे योगदान लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युलता आढाव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुळे यांनी तर आभार प्रदर्शन वृषाली कडलग यांनी केले.



