संगमनेरात बळीराजाची मिरवणूक !

प्रतिनिधी —

बलिप्रतिपदा निमित्त संगमनेर शहरात ‘बळी राजा गौरव मिरवणूक’ काढण्यात आली. मिरवणुकीचे यंदा पहिले वर्ष होते. बळी राजाला कपटाने वामनाने पाताळात लोटले, त्याचा खून केला आणि बहुजनांचा राजा असलेल्या बळी राजाचा नायनाट केला. शेतकरी समूहाचे दैवत असलेल्या बळी राजाला अभिवादन करण्यासाठी या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली.

देशभरातील शेतकरी सध्या हवालदिल आहेत. शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. शेतीचे कंपनीकरण होत असल्याने शेती व्यवसाय उध्वस्त होत आहे. सोबतच सांस्कृतिक दहशतवाद देखील पसरवला जात आहे. ब्राह्मणी व्यवस्थेने बहुजनांची प्रतीके नासवली आहेत. बळी राजा सारख्या रयतेच्या राजाला नमोहरम करण्याचा प्रयत्न केला आहे अश्या भावना आयोजकांनी व्यक्त केल्या.

मिरवणूकित ईडा – पीडा टळो बळीचे राज्य येवो, भारतीय संविधान जिंदाबाद, बळीराजा जिंदाबाद अश्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी प्रा. उल्हास पाटील, सीताराम राऊत, राजाभाऊ अवसक, तुळशीराम जाधव, ॲड. समीर लामखडे, श्रीनिवास पगडाल, गोपाळ नेवे, सागर भालेराव, दत्ता ढगे, अनिकेत घुले, राम अरगडे, संदीप काकड, पंकज पडवळ, अजीज ओहरा, ओंकार बिडवे, रवी दिवे, किरण भालेराव, प्रवीण गुंजाळ, रवी गुंजाळ, ओंकार अभंग, साहिल खरात, कावेरी आहेर, कार्तिक शेलार, तनाया घोसाळे, श्रुष्टि घोसाळे, गणेश जोंधळे, तुषार पानसरे, किरण भालेराव, विशाल मिसाळ, सागर मोरे, सोहम घुले, आदी राष्ट्र सेवादल, छात्रभारती, संभाजी ब्रिगेड, गाथा परिवार सह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!