महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या हस्ते संगमनेर भाजपच्या वतीने जुन्या पुणे नासिक महामार्गावरील पथदिव्यांचे उद्घाटन !
प्रतिनिधी —
महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या हस्ते शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नासिक महामार्गावरील पथदिव्यांचे उद्घाटन करून संगमनेर भारतीय जनता पक्ष आणि नागरीकांनी केंद्र सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली. धन्यवाद मोदीजी फलकही लावण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पुणे नासिक राष्ट्रीय महामार्गवरील पथदिव्यांचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. वृषाली सतिष नाईकवाडी, आदीती बाळासाहेब नरवडे, आकांक्षा बाळकृष्ण वर्पे, समिक्षा आत्माराम खैरनार या महाविद्यालयीन विद्यार्थींनीच्या हस्ते पथदिव्याच्या रोहीत्राचे पूजन करण्यात आले. तिरंगी फुगे आणि फटाक्यांची अतिषबाजी करून या कामासाठी केंद्र सरकारने केलेल्या भरघोस सहकार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना ॲड. श्रीराम गणपुले यांनी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हे कामपूर्ण झाले आहे. पण जाणीवपुर्वक सवयीप्रमाणे श्रेय लाटण्याचे काम स्थानिक नेते करीत आहे. परंतू हे सर्व श्रेय केंद्र सरकारचे असून त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.

अमोल खताळ यांनी केंद्र सरकारमुळे आज शहराला या पथदिव्यामुळे चांगले स्वरुप मिळत आहे. परंतू अनेक वर्षे सता असूनही ज्यांना करता आले नाही ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने होत आहे. परंतू सगळे माझ्यामुळे होते. असा मी पणा मिरवणाऱ्यांचा खोटेपणा यापुर्वी अनेकादा उघड झाला.

माजी नगरेवक ज्ञानेश्वर कर्पे यांनी कामाचे खोटे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध केला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

