निवडणूक – आमदार पडणार ; दोन गटात हाणामारी !

पोलिसांच्या गाडीतून आलेल्या समर्थकांनी आणि पोलिसांनीही केली मारहाण 

संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

तालुक्याच्या एका गावात लग्न समारंभा निमित्त असलेल्या कार्यक्रमात एका मंगल कार्यालयात रात्री राजकीय चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये निवडणूक आणि राजकारणाचा विषय निघला? त्यात एका तरुणाने आमदार पडणार म्हणून मत व्यक्त केले. ते आमदार समर्थकाला आवडले नाही. त्यामुळे दोघात हाणामारी झाली. त्यानंतर आमदार समर्थकाने गावातील आमदाराच्या एका खास माणसाला फोन लावला. त्या खास माणसाने तेथे येऊन त्यात सहभाग घेतला. हाणामारी वाढली. त्यानंतर पोलिसांची गाडी आली. या गाडीत सुद्धा काही जण समर्थक बसून आले. त्यांनी आणि पोलिसांनी देखील आमदार पडणार म्हणणाऱ्या त्या युवकाला मारहाण केली. रात्री उशिरा प्रकरण पोलिस ठाण्यात गेले आणि नंतर मिटवण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील राजकीय दहशत वाढत चालली असून पोलीसह राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक बनले आहेत चर्चा आता या घटनेनंतर त्या गावात सुरू आहे. पोलीसच गुंडांना पाठीशी घालत असतील आणि कुठलाही गुन्हा दाखल करत नसतील, मितवा मिटवी करत असतील तर तालुक्यात कायद्याचे राज्य राहिले नाही असेच आता समोर येत आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण पोलीस खातेच बदनाम होत असल्याचे चित्र असून तालुक्यात आणखीन काय काय घडेल हे सध्या तरी सांगता येत नाही. मात्र तालुक्याचा भविष्यकाळ हा गुंडागर्दी, हाणामारी आणि दहशतीचा असेल असा अंदाज काही नागरिक व्यक्त करतात.

त्याचे असे झाले की, संगमनेर शहरापासून जवळच असणाऱ्या एका गावात लग्नानिमित्त आदल्या रात्री एका मंगल कार्यालयात कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात तरुण देखील सहभागी झालेले होत. त्या ठिकाणी निवडणुका, राजकारण या विषयावर चर्चा सुरू झाली. त्यात एका तरुणाने आमदार पडणार असे वक्तव्य केल्याने त्या आमदाराच्या समर्थकाला राग आला आणि दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. आमदाराच्या समर्थकाने त्या गावातील आमदाराच्या एका खास व्यक्तीला बोलावून घेतले. सदर व्यक्ती त्या ठिकाणी आली आणि त्याने देखील त्या तरुणाला मारहाण केली. नंतर प्रकरण वादावादी वाढली आणि कोणीतरी पोलिसांना फोन केला.

फोन करणारी व्यक्ती मोठी ताकदवान असावी. कारण पोलिसांच्या गाडीतून देखील काही समर्थक आले आणि त्यांनी देखील त्या तरुणाला मारहाण केली. पोलिसांनी देखील त्यांच्या स्टाईलने त्या तरुणाला फटके लगावले आणि त्याला गाडीत घालून पोलीस स्टेशनला नेले. त्यानंतर गावातील काही मंडळी आणि तरुणाचे आई-वडील देखील पोलीस स्टेशनला हजर झाले. त्या आमदाराची समर्थक पार्टी मात्र गायब होती. त्यांना पोलिसांनी हात देखील लावला नाही. नंतर पोलीस स्टेशनमध्ये खाकी वर्दीच्या स्टाईलने चर्चा झाल्या. धमक्या झाल्या. मार खाल्लेल्या तरुणाच्या आई-वडिलांनी मुलाचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून फिर्याद दाखल दिली नाही. पोलिसांनीही दोन गटात हाणामारी झाली म्हणून स्वतःहून कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. प्रकरणाची मिटवा मिटवी झाली.

 या सर्व प्रकारातून संगमनेर पोलिसांच्या भूमिकेची मात्र चर्चा होऊ लागली. सकाळी गावात चर्चा घडू लागली आणि बघता बघता ती पसरली. पोलिसांची एकतर्फी भूमिका, कर्तव्य याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या वागणुकीकडे आणि कर्तव्याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!