विदेशी दारू आणि गावठी हातभट्ट्या उध्वस्त !

तब्बल १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; लाखो रुपयाचा मुद्देमाल नष्ट !

स्थानिक गुन्हे शाखा नगरच्या पथकाची कारवाई

प्रतिनिधी —

स्थानिक गुन्हे शाखा नगरच्या पथकाने कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नगर मधील अवैध विदेशी दारू व गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त केले असून १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी सुमारे पावणे सात लाखाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

या कारवाईतील प्रमुख आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – प्रकाश पार्थनात रॉय (रा. नथुरा ग्राम, तालुका हंस खली, जिल्हा नदिया, कलकत्ता), नंदाबाई दादा काळे (रा. सुरेगाव, तालुका कोपरगाव), राहुल माणिक जाधव (रा. नांदूरी, तालुका राहता), दिनकर रामनाथ काथे (रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर), विष्णू पांडुरंग जाधव (रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर), मीना शाम पवार (रा. भैरवनाथ नगर, श्रीरामपूर), साधना मोहन काळे (रा, सुतगिरणी, श्रीरामपूर), वंदना संतोष काळे (पाण्याच्या टाकीजवळ, वार्ड नंबर २, श्रीरामपूर), सुनील अण्णा गवळी (रा. गोपाळ वाडा, वार्ड नंबर २, श्रीरामपूर), शिवाजी प्रकाश परदेशी (रा. सूतगिरणी, श्रीरामपूर), उषा प्रभाकर काळे (रा. श्रीरामपूर,) नाज फकीर मोहम्मद शेख (रा. ममदापूर, तालुका राहाता) कमल गव्हाणे, (रा. वार्ड नंबर २, श्रीरामपूर),अनिल मच्छिंद्र पवार (रा. बेलापूर, श्रीरामपूर), संजय जनार्दन नरवडे (रा. गायकवाड वस्ती, श्रीरामपूर)

नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध विदेशी दारू व गावठी दारू हातभट्टी सुरू असल्याच्या माहिती मिळत होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेला या संदर्भात आदेश देऊन पथक नेमण्यात आले होते. या पथकाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये ७७० लिटर गावठी हातभट्टीची दारू ११ हजार ९०० लिटर कच्चे रसायन व हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक असलेली साधने असा एकूण ६ लाख ७५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे व १५ आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!