संगमनेरात जल्लोषपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे आगमन….

प्रतिनिधी —

संगमनेरातील सार्वजनिक मंडळाच्या गणेशासह आज संगमनेरच्या घरोघरी गणेश स्थापना जोरदार पणे करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या आजच्या मुहूर्तावर संगमनेर शहरात उत्साहाचे वातावरण होते.

श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी शहरातील विविध चौकांमध्ये भक्तांनी गर्दी केली होती. पारंपारिक गणपती मिळवण्यासाठी कुंभार आळा, नवीन नगर रोड, शहरातून जाणारा पुणे नाशिक महामार्ग, सह्याद्री विद्यालय, केसकर कॉम्प्लेक्स केकवाला शॉपी, मार्केट यार्ड सह विविध ठिकाणी गणेश मूर्ती आणि सजावटीचे सामान विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. नागरिकांसह गणेश भक्तांनी लहान मुलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

यावर्षी गणेश मूर्तीचे भाव वाढलेले आहेत. महागाईचा झटका गणेशमूर्ती विक्रेत्यांना आणि निर्मात्यांना देखील बसला आहे. ग्राहकांना देखील महागाईचा सामना करावा लागत आहे. आज सकाळीच दुर्वा (हरळ) घेण्यासाठी तसेच विविध रंगीत फुले मिळवण्यासाठी शहरातील नेहरू चौक, पेटीट हायस्कूल समोर नागरिकांनी गर्दी केली होती. विविध वाजंत्रीच्या तालात गणेशांचे घरोघरी आगमन झाले.

शहरासह उपनगरात मोठ्या उत्साहात श्री गणेश स्थापना करण्यात आली. घरोघरी सजावट, रांगोळी, मोदक प्रसादाचा सुगंध दरवळत होता. सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजत गाजत गणेश स्थापना केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!