अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणारे दोघेजण पकडले !

२७ लाख ४४ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

प्रतिनिधी —

अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करताना नगर स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना मुद्देमालासह आणि वाहनासह पकडले आहे. त्यांच्याकडून २७ लाख ४४ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बाबू लखुभाई राठोड (रा. राजकोट, राज्य गुजरात), सिध्देश संदीप खरमाळे (रा. भांडगांव, ता. पारनेर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की एक आयशर कंपनीच्या विटकरी रंगाच्या टेम्पोमधून गोवा राज्यातून विदेशी कंपनीची दारु महाराष्ट्रात विक्रीचा परवाना नसताना विना परवाना बेकायदेशिरित्या नगर- कल्याण रोडने अहमदनगर कडे येत आहे.

आहेर यांनी प्राप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकास कळवून कारवाई करण्यास सांगितले.  पथकाने नगर कल्याण रोड, नेप्ती नाक्याजवळ पहाटे सापळा लावून संशयीतांची वाट पाहत असता थोड्याच वेळात एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला. पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करता चालकाने टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. त्यावेळी गाडीचे केबिनमध्ये दोन इसम बसलेले पथकास दिसले. आयशर टेम्पोची पाहणी करता टेम्पोमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी दारुचे बॉक्स असल्याची खात्री होताच. दोन्ही इसमांना विदेशी दारु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपूस करता त्यांनी वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, संतोष लोढे, संदीप दरदंले, संतोष खैरे, फुरकान शेख, पोलीस शिपाई रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड या पथकाने ही कारवाई केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!