भाकपचे राष्ट्रीय नेते कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांचे संगमनेर मध्ये व्याख्यान

प्रतिनिधी —

सद्यस्थितीच्या देश व राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका व पुढील धोरण जाहीर करण्यासाठी भाकपचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड डॉ. भालचंद्र कानगो यांच्या व्याख्यानाचे शनिवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता संगमनेर येथे दुर्वे नाना सभागृहात आयोजन केले असल्याची माहिती भाकपचे संगमनेर सेक्रेटरी कॉ. प्रताप सहाणे यांनी दिली आहे.

‘महाराष्ट्रातील बदलती राजकीय परिस्थिती व पक्षाची भुमिका’ या विषयासंबंधी कॉम्रेड कानगो बोलणार असून याप्रसंगी राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य तुकाराम भस्मे, राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, सहसचिव प्रा. राम बाहेती आदी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

संगमनेर-अकोले तालुक्यातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कौन्सिल सदस्य ॲड. ज्ञानदेव सहाणे, माधव नेहे, दशरथ हासे, भास्करराव पावसे, दशरथ हासे यांनी केले आहे. या प्रसंगी संगमनेर अकोले तालूक्यातील ज्येष्ठ पुरोगामी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!