घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरूच !

रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोड्या होत असल्याने पोलिसांच्या एकंदरीत कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात असणाऱ्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा मोठी घरफोडी झाली असून चोरट्यांनी घरातील सोन्याच्या दागिन्यांसह १ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे. पठार भागातील वनकुटे गावात ही घरफोडी झाली असून घारगाव पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

सूर्यकांत तुळशीराम हांडे (रा. वनकुटे, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हांडे यांच्या घराच्या दरवाजाचे तीन लॉक टिकावाने तोडून दिनांक ९ व दिनांक १० जुलै २०२३ सकाळच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम, एक टेलिव्हिजन संच, चार तोळे सोन्याच्या बांगड्या आणि दीडशे किलो सोयाबीन चोरून नेले असल्याची फिर्याद दिली आहे. घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार आदिनाथ गांजले हे पुढील तपास करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!