अकोले नगरपंचायतच्या विषय समित्या व सभापतींची निवड जाहिर !
सागर चौधरी, कविता शेळके, तमन्ना शेख, जनाबाई मोहिते, बाळासाहेब वडजे यांना संधी…
प्रतिनिधी —
अकोले नगरपंचायतच्या विषय समित्याची आज निवड जाहिर झाले असुन सार्वजनिक बाधकाम समिती सभापती पदी नगरसेवक सागर चाैधरी, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती कविता परशुराम शेळके, महीला व बालकल्याण समितीला तमन्ना मोसिन शेख, आरोग्य व स्वच्छता वैद्यक समिती जनाबाई नवनाथ मोहिते तर नियोजन व विकास समितीच्या सभापती पदी बाळासाहेब काशिनाथ वडजे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अकोले नगरपंचायतची विशेष सभा आज बुधवारी पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे याचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी त्यानां सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी काम पाहिले

सकाळी ११ ते १२ पर्यत विषय समिती सदस्यपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी भाजपाचेच सर्व अर्ज आले तर विरोधी अर्जच न आल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्या आहे.
विषय समिती सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे
नियोजन व विकास समिती- बाळासाहेब काशिनाथ वडजे (सभापती), शितल अमोल वैद्य, हितेश रामकृष्ण कुंभार, प्रतिभा वसंत मनकर
सार्वजनिक बाधकाम समिती- सागर निवृत्ती चाैधरी (सभापती) वैष्णवी सोमेश्वर धुमाळ, माधुरी रविद्र शेणकर, हितेश रामकृष्ण कुंभार
पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती- कविता परशुराम शेळके (सभापती) शरद एकनाथ नवले, शितल अमोल वैद्य, वैष्णवी सोमेश्वर धुमाळ,
आरोग्य व स्वच्छता वैद्यक समिती- जनाबाई नवनाथ मोहिते (सभापती) शरद एकनाथ नवले, शितल अमोल वैद्य, वैष्णवी सोमेश्वर धुमाळ,
महीला व बालकल्याण समिती – तमन्ना मोसिन शेख (सभापती) शितल अमोल वैद्य, प्रतिभा वसंत मनकर, माधुरी रविद्र शेणकर

भारतीय जनता पार्टी कार्यालयात माजी मंत्री मधुकर पिचड व वैभव पिचड यांनी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन इच्छुकांच्या मुलाखत घेतल्या नंतर सर्व विषय समिती सदस्य व सभापतीपदासठी नावांची घोषणा केली. नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सुनिल दातीर, सुधाकर देशमुख, सीताराम भांगरे, यशवंतराव आभाळे, रमेश राक्षे, दगडू हासे,अर्जुन गावडे, बाळासाहेब सावंत, सी.ए.असिफ शेख, परशराम शेळके, अरूण शेळके, मोसिन शेख यांच्या सह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

