कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या १७ गोवंशाची सुटका !

प्रतिनिधी —

कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या १७  गोवंशाची आश्वी पोलीसांनी सुटका केली असून फीरोज नबाब शेख (वय ३३, रा. शेडगाव, ता. संगमनेर) यास ताब्यात घेतले आहे.

शेडगाव येथून कत्तलीसाठी जनावरे नेली जाणार असल्याची गोपनीय माहिती आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळाल्या नंतर विनोद गंभीरे, विलास दांडगे, शांताराम झोडगे यांच्या पथकाने शेडगाव ते शेडगाव फाटा या दरम्यान सापळा लावला आसता फिरोज नबाब शेख हा सुझुकी कंपनीच्या सुपर कॅरी टरबो या पांढर्‍या रंगाच्या एम एच १७ बी वाय, ४९१० या गाडीत आठ ते पंधरा दिवस वयाचे १७ नवजात वासरे निर्दय तेने भरुन कत्तल करण्यास घेऊन जात असतांना त्यास ताब्यात घेतले. त्याच्या कडुन जनावरे व टेम्पो असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!