संगमनेरात गांजा पकडला !

प्रतिनिधी —

पुण्याहून संगमनेरमध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा संगमनेर शहर पोलिसांनी पकडला आहे. दोन किलो गांजा व आरोपीला मुद्देमाला सह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी संदीप विष्णू पालांडे (वय 39 वर्ष, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर, पुणे 5) यास अटक करण्यात आली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोर्वे रोडने जाणाऱ्या एका संशयित वाहनचालकाला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत वाहन वेगात घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्याला कोल्हेवाडी रस्त्यावरील चर्चजवळ पकडले. वाहनाची झडती घेतली असता कारच्या डिक्की मध्ये गांजा असल्याचा संशय आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती तातडीने वरिष्ठांना दिली. व वाहन चालकाला ताब्यात घेतले.

त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्यासह पथकाने संशयित वाहनाची तपासणी केली. तसेच वाहनचालकाने पोलिसांना समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याचे वर्तन संशयास्पद वाटले. तपासणी मध्ये पोलिसांना प्लास्टिक सेलो टेपने गुंडाळलेले खाकी रंगाचे एक पाकीट आढळून आले यामध्ये 2 किलो 110 ग्रॅम वजनाचे काळपट हिरवट रंगाची पाने फुले काड्या असलेले त्यांना कॅनाबीस वनस्पतीचे शेंडे (उग्र वासाचा गांजा) आढळून आला.

कारवाई मध्ये पोलिसांनी सुमारे 18 हजार रुपये किमतीचा गांजा 4 लाख रुपये किमतीची नेक्सन कार व 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 4 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. विक्रीच्या उद्देशाने आणलेला हा गांजा आरोपीने कोणाकडून घेतला होता? संगमनेरात कोणाला विकला जाणार होता? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी संदीप विष्णू पालांडे (वय 39 वर्ष, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर, पुणे 5) याच्याकडून समाधानकारक माहिती मिळू शकली नाही.

शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रामकिशन मुन्नय्या मुकरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदीप विष्णू पालांडे याच्या विरोधात अमली औषधी द्रव्य व मनः प्रभावी पदार्थ विधी निषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 8 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!