महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन अकोले आगारात उत्साहात साजरा !
प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७५ वा वर्धापनदिन बस स्थानक परिसर स्वच्छ, सजावट करुन प्रवाशांना फुलं व पेढा देत अकोले डेपोच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आज ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने महामंडळाच्या अकोले आगाराचे वतीने विविध उपक्रम घेत प्रवाशांचे स्वागत करुन उत्साहात ७५ वा वर्धापन दिन साजरा केला.

आज सकाळपासून अकोले आगारात स्वच्छता, रंगरंगोटी करुन फुगे व फुलांनी बस स्थानक व परिसर सजवलेले होते. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढून ” प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परीवहन” असा संदेश देवून स्वागत केले होते. यावेळी आगारातून सुटणाऱ्या बसेसमधील प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आज अकोले ते परेल हि बस सुरु करण्यात येऊन या बस मधील प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे वाटून प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.

आगार व्यवस्थापक युवराज गंभीरे म्हणाले कि, लालपरीत काळानुरूप अनेक बदल करुन प्रवाशांना त्याच्या आवडीनुसार सुविधा देण्याचे काम महामंडळाने केले आहे.

आज अकोले आगार अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. यापुढेही हा प्रथम क्रमांक कायम ठेऊ असा विश्वास व्यक्त करुन अकोले आगारात अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याचा माणस असून कामातील शिस्तबद्ध पणा कायम ठेऊ. भविष्यात अकोले तालुक्यातील प्रत्येक गावात बस सेवा सुरु होऊन प्रवासी कसे वाढतील याकडे आपण लक्ष देणार आसल्याचे त्यानी सांगितले.

यावेळी त्र्यंबक कोकतरे, वाहतूक नियंत्रक लालू नाना, अशोक कडलग,संतोष पन्हाळे, एस.एस.चव्हाण, बी.डी.कर्णिक, सफाई कर्मचारी औचिते, वरिष्ठ लिपिक भोईर, शिवाजी गायकवाड, वसिम शेख, धनश्री बांबळे या कर्मचारी व कामगाराचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तविक वरिष्ठ सचिन वाकचाैरे यांनी केले. विश्वास आरोटे, अल्ताफ शेख, माधव तिटमे, भरत बंगाळ, डॉ. नितिन आरोटे उपस्थित होते.

