संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ;  

थोरात-विखे समर्थकांसह भाजपचे पदाधिकारी मैदानात !

संगमनेरातल्या बिनविरोध निवडणुकांना आव्हान !

 

संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत बासनात गुंडाळून ठेवलेले विरोधक महसूल मंत्री विखे पाटील यांच्या आधाराने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याची चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे.

 

प्रतिनिधी —

फक्त वृत्तपत्रातूनच एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप करणारे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता थेट निवडणुकीच्या रूपाने एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत.

संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी केली आहे.

संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून बिनविरोध निवडणुका घेण्याचा पायंडा आमदार थोरात यांनी पाडलेला आहे. यावर्षीच्या निवडणुकीत संगमनेरच्या बिनविरोध निवडणूक धोरणाला आव्हान देण्याचे काम महसूल मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसा अखेर १०८ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याचे चिन्हे निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत प्रथमताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली थोरात विरोधक निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत.

२८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अखेरचा दिवस होता. राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्याचे दिसते. त्यामुळे विखे समर्थक उमेदवारांचे अर्ज मोठ्या संख्येने आले आहेत. विशेष म्हणजे विखे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे इतर वेळी निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण देखील झाल्याचे दिसते.

आत्तापर्यंत दाखल झालेले उमेदवारी अर्ज खालील प्रमाणे:

कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघ शेतकरी प्रतिनिधी मतदार संघातून बाजार समितीचे विद्यमान सभापती शंकर हनुमंता खेमनर, तसेच भाऊराव रामराव देशमुख, यशवंत कारभारी शेळके, रंगनाथ मच्छिंद्र फटांगरे, संजय रामभाऊ फड, संभाजी दामू गुंजाळ, कैलास बाळासाहेब पानसरे, प्रभाकर कचरू गोपाळे, भास्कर पाटीलबा गोपाळे, एकनाथ दादा गोपाळे, मनीष सूर्यभान गोपाळे, सुरेश रामचंद्र कान्होरे, गीताराम दशरथ गायकवाड, विनायक बाजीराव काळे, दिनकर जयराम गडाख, सतीश विश्वनाथ खताळ, अनिल शिवाजी घुगे, बाळासाहेब लहाणू शेटे, गोविंद गमाजी कांदळकर, डॉ. अशोक वामनराव इथापे, शिवाजी बाळासाहेब गुंजाळ, भीमराज नामदेव चत्तर, प्रकाश गंगाराम भालके, योगेश मधुकर देशमुख, रवींद्र बाबुराव देशमुख, ॲड. पोपटराव गंगाधर वाणी, विकास शांताराम गायकवाड, पोपट बाबुराव आहेर, संजय दत्तात्रय पावसे, कचरू भाऊपाटील वारुक्षे, कचरू बाळा फड, संजय सदाशिव कवडे, सोमनाथ रामचंद्र कानवडे, काशिनाथ रभाजी पावसे, सोपान काशिनाथ दिघे, ॲड. श्रीराम अरविंद गणपुले, सोमनाथ कारभारी नेहे, विठ्ठल रघुनाथ पानसरे, धोंडीराम तुकाराम राहणे, सोपान सिताराम जोंधळे, पोपट आप्पासाहेब भोसले, रमेश नामदेव शिंगोटे, विजय विठ्ठल सातपुते यांचा समावेश आहे.

सोसायटी मतदार संघ वि.जा.भ.ज. मतदार संघातून सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये शंकरराव हनुमंता खेमनर, अनिल शिवाजी घुगे, संदीप भाऊसाहेब घुगे, अनिल शिवराम खेमनर, संजय रामभाऊ फड, बुवाजी भागा खेमनर व श्रीकांत त्रिंबक गोमासे यांचा समावेश आहे.

इतर मागासवर्गीय मतदारसंघातून चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यात सुधाकर पुंजाजी ताजने, आशा संदीप क्षीरसागर, अरुण भागवत कुळधरण, शरद ज्ञानदेव गोर्डे यांचा समावेश आहे.

महिला राखीव मतदार संघातून रुख्मिणी शिवाजी साकुरे, दिपाली भाऊसाहेब वर्पे, अंजनाबाई पुंजा दिघे रोहिणी किशोर निघुते शशिकला शिवाजी पवार व इंदुबाई मधुकर रुपवते या सहा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातून शंकरराव हनुमंता खेमनर, रामकृष्ण नाथा पांडे, दत्तात्रय केशव गुंजाळ, अरुण तुळशीराम वाघ, सखाहरी बबन शरमाळे, सतीश पुंजा कानवडे, शिवाजी पांडुरंग वलवे, गजानन कोंडाजी खाडे, रामकृष्ण निवृत्ती गाडेकर, संदीप भास्करराव देशमुख, जनार्दन म्हातारबा आहेर, सोमनाथ पुंजा गोडसे, नानासाहेब सुखदेव उंबरकर, संतोष विश्वनाथ घुगे, प्रमोद सतीश बोंद्रे, निशा अशोक काळे व संतु गंगाधर कुटे या सतरा जणांचा समावेश आहे.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून निलेश बबन कडलग, निलेश बबन कडलग, संजय दत्तात्रय पावसे व दत्तात्रय श्रावण चांदे या चार जणांनी अर्ज दाखल केले.

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून शैला मंजाबापू साळवे, संजय दादा खरात, दादा कोंडाजी गायकवाड, महादू जानकू गोंदे, शिवाजी मारुती गवारे, आत्माराम संतु जगताप, महेश अण्णासाहेब उदमले आणि विकास शांताराम गायकवाड या आठ जणांचे अर्ज दाखल झाले.

व्यापारी मतदारसंघातून १५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये लाला अहमद बेपारी, शौकत सरदार बागवान, उबेद रशीद शेख, मनसुख शंकर भंडारी, अजिज गुलाम हुसेन शेख, भारत विश्वनाथ मुंगसे, अजिजखा करीमखान पठाण, निसार गुलाब शेख, समीर निसार शेख, योगेश मधुकर देशमुख, नामदेव मनाजी सरोदे, सुभाष शंकर गुंजाळ, खलील नबाब शेख, रफिक पापा (बेपारी) शेख व नबी पापा शेख.

हमाल मापारी मतदारसंघातून सचिन बाळकृष्ण कर्पे, सचिन बाळकृष्ण कर्पे, विकास ज्ञानेश्वर लहामगे, महेंद्र रखमा गुंजाळ व सोमनाथ तुकाराम दिघे यांचे पाच अर्ज दाखल झाले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!