उच्चांकी गर्दीत शिंदेशाही बाणा कार्यक्रमाची धमाल !

आमदार थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तालुका एकवटला

प्रतिनिधी —

एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला देणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभाग घेतला असून तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त झालेल्या शिंदेशाही बाणा कार्यक्रमात विक्रमी गर्दीत नागरिकांनी धमाल केली.

जाणता राजा मैदान येथे आमदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शिंदे शाहीबाणा हा कार्यक्रम प्रख्यात गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात आदींसह आमदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता या गीताने सुरुवात केली. तर महागायक आनंद शिंदे यांनी पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा हे गाणे गाताच उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर मिलिंद शिंदे यांनी गायलेली गेला कान्हा कुण्या गावा या गवळणीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. स्टार गायक उत्कर्ष शिंदे यांनी तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, अंबे कृपा करी हे गीत गातात सर्वत्र एकच जल्लोष झाला.

यानंतर आनंद शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गायलेल्या घेताना नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्य भूमीवर, एक त्या रायगडावर एक त्या चवदार तळ्यावर या गीता वेळी अंगाला शहर आले. तर घागर गळकी घेऊन बाई निघाली, जवा नवीन पोपट हा यांसह विविध लोकगीतांनी धमाल उडून दिली. कोंबडी पळाली यांसह आदर्श शिंदे यांनी गायलेले तुझ्या रूपाचं चांदणं याचबरोबर आवाज वाढव डीजे या गीताला उपस्थित तरुण व महिलांनी भरभरून दाद दिली यासह आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांनी गायलेली उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली या कव्वाली ला संगमनेर करांनी डोक्यावर घेतले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!