सांगवी गावातील विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन इंद्रजीत थोरात यांचे हस्ते संपन्न
प्रतिनिधी
प्रतिनिधी
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, आर. एम. कातोरे यांच्या हस्ते सांगवी गावातील विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन पार पडले.
यावेळी अरुण गुंजाळ (सदस्य ग्रामपंचायत निमज), विमल कातोरे (सरपंच सांगवी), नवनाथ कातोरे (उपसरपंच सांगवी), सुधीर कातोरे, बाळासाहेब झोडगे (पोलिस पाटील), साहेबरावदादा कातोरे, पंडित कातोरे, संतोष गायकवाड, नेताजी कातोरे, पांडुरंग कातोरे, गणपतराव कातोरे, सिद्धार्थ वैराट प्रसाद कानवडे,आबांदास कातोरे,भागवत कातोरे भानदास कातोरेअनंत कातोरे, गोरक्षनाथ कातोरे, बाळासाहेब कातोरे आदी उपस्थित होते
यावेळी इंद्रजीत थोरात म्हणाले कि, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याची विकास कामातून प्रगती झाली आहे. तालुक्यात वाडी वस्तीवरही विकासाच्या अनेक योजना पोहचल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगवी गावामध्ये विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन होत आहे.

यामध्ये धनगर ओढा ते पतिंगबाबा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १५ लक्ष, मधला मळा ते काळा माथा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ७ लक्ष, अंगणवाडी इमारत बांधकाम करणे. ७.५ लक्ष, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे. ७.० लक्ष, स्मशानभूमीसाठी रस्ता कॉंक्रीटकरण करणे व कमान बांधकाम करणे. १२ लक्ष, राजवाडा ते निमगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ५ लक्ष, पानद रस्ता बिरोबा मंदिर ते बाळासाहेब भिमाजी कातोरे वस्तीपर्यंत. या कामांचा शुभारंभ तसेच मराठी शाळेसामोरील व्यायाम साहित्य लोकार्पण सोहळा या कामांचा समावेश आहे.
Post Views: 62