क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी शिक्षणातून समाजपरिवर्तनाचे केलेले कार्य ऐतिहासिक – दुर्गा तांबे

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

प्रतिनिधी
भारतीय समाज सुधारणेत अनेक महापुरुषांचे त्याग सदैव प्रेरणादायी असून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांसह बहुजनांचे शिक्षण व शिक्षणातून समाज परिवर्तनासाठी केलेले कार्य ऐतिहासिक व क्रांतीकारक असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा  दुर्गा तांबे यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहात क्रांतीयोती सावित्राबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, स्मिता आहेर, सुनंदा दिघे, स्वाती शहा, कमल मेमाणे, सौदामिणी कान्होरे, सुनिता कांदळकर,संगिता दिघे, अनुराधा आहेर, अश्‍विनी वालझाडे आदि महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. तर जयहिंद महिला मंचच्या वतीने आयोजित ऑनलाईन वकृत्व स्पर्धा, पाककला, रांगोळी, नवदुर्गा अवतार या स्पर्धा विजेत्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या कि, आजच्या युगात स्त्री स्वत:च्या पायावर उभी राहु शकते स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. अन्यायाविरोधात लढा उभारु शकते. हे केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रतिक आहे. देशाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांनी सर्वसमावेशक समाजसेवा करुन एक अपूर्व आणि क्रांतीकारी परंपरा निर्माण केली. त्यांचे स्त्री विषयक कार्य म्हणजे भारतातील स्त्रीयांच्या सार्वजनिक जिवनातील एक युगप्रवर्तक अशीच घटना आहे.

संगमनेर शहरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून सक्षम बनल्या आहेत.  आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने नेत्रदिपक प्रगती करीत असून आजची स्त्री सावित्रीबाई फुले यांचा वारसा सक्षमपणे चालवत आहे. सावित्रीबाईंनी सामाजिक न्याय, विषमता नाहिशी होणे आणि आत्मसन्मान जागविण्यासाठी त्यांनी स्त्रीयांना शिक्षणातून पुढे आणले. ज्यावेळी स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा नव्हता अशा वेळी मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा,नवसंजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले असल्याचे ही त्या म्हणाल्या.
यावेळी स्वाती शहा, सुनंदाताई दिघे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अश्‍विनी वालझाडे यांनी केले तर जयहिंद महिला मंचच्या सचिव सुनिता कांदळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!