कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या !

प्रतिनिधी —

भक्ष्याच्या शोधात रात्रीची भटकंती करत असताना कोंबडी पळवण्याच्या उद्देशाने पिंजऱ्यात घुसलेला बिबट्या स्वतःच अडकून पडल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागात घडली आहे

दरम्यान वन विभागाला ही माहिती समजतात तातडीने घटनास्थळी येत मोठ्याला कोंबड्यांच्या खुराड्यातून काढून वनविभागाच्या पिंजऱ्यात बंद केले आहे.

संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथील शेतकरी घनश्याम भागाजी फटांगरे यांच्या वस्तीवरील शेतात कोंबड्या ठेवण्यासाठी लोखंडी जाळीचे खुराडे केलेले आहे.

बुधवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याला खुराड्यात कोंबड्या दिसल्याने तो कोंबड्या खाण्यासाठी त्या खुरड्यात शिरला आणि स्वतःच अडकून बसला.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सध्या बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. हा बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकल्याचे वनविभागाला समजल्यानंतर वनाधिकारी चैतन्य कासार यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!