मलाही थोडसं बोलू द्याल का ?

डॉ. अलीम वकील

 

रवींद्र माधव साठे यांचा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी लोकसत्ता दैनिकात ‘आंबेडकर, हेडगेवारांचे उद्दिष्ट समान’ या शीर्षकाचा लेख आला होता. त्याला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशचे सचिव श्रीयुत सचिन सावंत यांनी १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘आंबेडकर-हेडगेवारांची अयोग्य तुलना’ या शीर्षकाने उत्तर दिलं होतं. 

संबंधित वाद-प्रतिवादात दोन्ही लेखकांनी गुरुवर्य डॉ. अलीम वकील यांच्या एका पुस्तकाचा संदर्भ देऊन विपर्यस्त अर्थ लावला होता. त्याविषयी डॉ. अलीम वकील यांनी आपला खुलासा सविस्तर शब्दात मांडून लोकसत्तेकडे पाठवला. परंतु अद्याप दैनिकाने तो प्रकाशित केला नाही. अशा परिस्थितीत डॉ. वकील तो फेसबुकवरून सार्वजनिक करत आहेत. 

 

 

वकील सरांच्या वतीने त्यांची ही अधिकृत भूमिका आहे. यावर येणाऱ्या प्रतिक्रिया सरांपर्यंत पोहोचवल्या जातील…

मलाही थोडसं बोलू द्याल का ?

डॉ. अलीम वकील

 

श्री साठे यांचा लोकसत्तेतील लेख ‘आंबेडकर हेडगेवारांचे उद्दिष्ट समान’ हा लेख व त्याचा प्रतिवाद करणारा श्री सचिन सावंत यांचाही लेख वाचला. दोन्ही सन्माननीय लेखकांनी जुलै १९९० साली मित्र प्रकाशन संगमनेरने प्रकाशित केलेल्या ‘महात्मा आणि बोधिसत्त्व’ या पुस्तकातील काही मुद्दे मांडले. त्या संदर्भात मला नम्रपणे निवेदन करणे अत्यावश्यक आहे.

(१) दोन्ही लेखकांनी माझे पुस्तक वाचायला हवे होते. निदान ब्लर्ब तरी, जे जेमतेम ‘आठ’ वाक्यांचे आहे. पुस्तकाचा विषय गांधीजी (महात्मा) आणि बाबासाहेब आंबेडकर (बोधिसत्व) असा आहे. दोन्ही महापुरुषांची तुलना करतांना गांधीजी न खूपदा टीकेचे धनी व्हावे लागते, बाबासाहेबांनीही गांधीजीवर प्रखर टीका केली आहे. पुस्तकात गांधीजींची आणि बाबासाहेबांची ‘काही विषयांवरील भूमिकांचे विश्लेषण करतांना दोघांचा हिंदुत्व’ या विषयाची चर्चा केली आहे. या चर्चेत बाबासाहेबांनी सावरकर, मुंजे याच्यावर विश्वास ठेवून अस्पृश्यता निवारण होऊन हिंदू संघटन होऊन मुस्लीम राजकीय आक्रस्तेपणाला लगाम घालता येईल अशी भूमिका घेतली. या संबंधीचे पुरावे कुठल्याही ‘संघाच्या’ पुस्तकातून घेतलेले नसून स्वतः बाबासाहेबांच्या लेखनातून घेतलेले आहेत. वाचक याची शहानिशा करू शकतात.

(२) या पुस्तकात डॉ हेडगेवार यांचे नाव एकदाही आलेले नाही. श्री साठे आणि श्री सावंत यांनी ‘हेडगेवार’ यांचे नाव झालेल्या पानाचा नंबर’ सांगितल्यास मी ऋणी होईन.

(३) श्री सचिन सावंत यांना माझ्या पुस्तकावर परिसंवाद झाल्याची वार्ता कळली ती खरी आहे. परंतु परिसंवादात काय चर्चा झाली याची माहिती अपूर्ण आहे.. तारीख माझ्या लक्षात नाही, कदाचित सावंतांना माहित असेल, मार्क्सवादी पक्षाने पुण्याच्या ‘गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकनॉमिक्स’मध्ये दिवसभर ही चर्चा ठेवली होती. अध्यक्षा मा, नलिनी पंडित होत्या. परिसंवादात प्रा. राम बापट, प्रा. रावसाहेब कसबे, डॉ राजेन्द्र व्होरा आणि विशेष म्हणजे डॉ रत्नाकर महाजन होते. डॉ महाजनांनी माझी अंकेडेमिक भूमिका – लावून धरली होती नाही तर मी एकाकी ‘पडलो असतो. सावंत म्हणतात, माझ्या भूमिकेचे पूर्ण खंडन करण्यात आले. या खंडनाला मी दिलेले उत्तर सावंतांना माहित नसेल, या खंडनाचे मी खंडनही केले आहे. संपूर्ण चर्चेचे ध्वनिमुद्रण झाले हे आहे. परिणामांची जवाबदारी स्वीकारून तिचे शब्दांकन करून ती प्रकाशित करावी.

(४) माझा आणि माहित असणाऱ्या दोन पिढ्यांचा संघाशी सुतराम संबंध नाही. मी राष्ट्रसेवा दलाचा. समाजवाद्यांशी माझी जवळीक असली तरी त्यांची विचार- प्रणाली मला पटली तेवढीच मी घेतली. मी न पाहिलेल्या व पाहिलेल्या अनेक समाजवाद्यांशी माझे फार मधुर संबंध आहेत अशातला भाग नाही. सामाजिक चळवळींमध्ये माझा सहभाग नाही, त्यामुळे विचार परिपक्व होत नाहीत अशी न्यांची धारणा असेल त्यांच्या दृष्टीने मला कुणी अपरिपक्व म्हटले तर त्यांचे स्वातंत्र्य सर आँखो पर… माझ्या समकालीन दिग्गज विचारवंतांनी मी हे पुस्तक प्रकाशित करू नये असा सल्लाही दिला होता. विचारप्रणालीच्या बांधिलकीने विचार स्वातंत्र्याला मर्यादा पडतात असे मला वाटते.

(५) या पुस्तकाचे प्रकाशन गोखले इन्स्टिट्यूटमधील अर्थशास्त्राचे दिग्गज प्राध्यापक, प्रसिद्ध गांधीवादी प्रा. डॉ भ. ग. बापट यांच्या हस्ते संगमनेर महाविद्यालयात झाले होते. गांधीवादी विचारवंत माननीय वसंत पळशीकर, डॉ राजेन्द्र व्होरा आणि प्रा अविनाश डोळस यांनी पुस्तकावर चर्चा केली. या सर्वांनी हे पुस्तक काळजीपूर्वक वाचले होते. आणखी एका मुख्याची विशेष नोंद करणे अत्यावश्यक आहे की, या कार्यक्रमाला त्यावेळी मुंबई विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ अशोक मोडक यांनासुद्धा या प्रकाशन समारंभाला आवर्जून निमंत्रण दिले होते. परंतु कदाचित कार्यबाहुल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. प्रा मोडक यांचा परिचय मी देण्याची गरज नाही. या वक्त्यापैकी एकाने ही सचिन सावंतांसारखा आक्षेप घेतला नाही की, पुस्तकातील संदर्भ आर. एस्. एस्.मध्ये काम करणाऱ्या वा त्यांची विचारसरणी मांडणाऱ्या लेखकांच्या पुस्तकातील आहेत. सर्व सहभागी वक्त्यांनी पुस्तकाचे कौतुक केले.

या पुस्तकाचे पहिले परीक्षण महाराष्ट्र टाईम्समध्ये मा. एकनाथ साखळकर यांनी तर दुसरे परीक्षण समाज प्रबोधन पत्रिकेत प्रा. अविनाश डोळस यांनी केले आहे. हे अंक माझ्याजवळ आहे, मला सर्वात शेवटी, श्री साठे यांनी कृपा करून संघाचा शिलेदार समजू नये. संघावर बाबासाहेबांनी केलेली साली सोडली टीकेची नोंदसुद्धा ‘महात्मा आणि बोधिसत्व’ मध्ये आहे. साठेंच्या निवेदनाकडे मी दुर्लक्ष केले असते, परंतु सचिन सावंतांचा मी चाहता आहे. त्यांना मी दूरदर्शनवर नेहमी पाहतो आणि ऐकतो. सध्याच्या राजकारणात मला आणि माझ्यासारख्या अनेकांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. माझ्या शैक्षणिक आणि लेखन कार्यात भी आयुष्यभर जपत आलेल्या’ इंटिग्रीटी’कडे त्यांनी केलेल्या इशाऱ्यामुळे हे लिहिले. माझ्या बाजूने हा विषय संपला आहे.

कलीम अजीम यांच्या फेसबुक वॉल वरून

 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!