अकोले नगरपंचायत निवडणू
४ प्रभागातुन १९ व्यक्तीचे २२ उमेदवारी अर्ज दाखल…!
भाजपा, राष्ट्रवादी सेना आघाडी व कॅाग्रेसने शक्तीप्रदर्शन करत भरले अर्ज ..!
आज अर्ज भरण्याचे शेवट दिवशी तब्बल २० उमेदवारांचे अर्ज दाखल..!
प्रभाग क्र ४,११ ,१३ व १४ मध्ये 
१८ जानेवारीला निवडणूक….!
अकोले
अलताफ शेख
अकोले नगरपंचायतच्या ४ प्रभागातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी १९ जणांनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी भाजपा ,राष्ट्रवादी सेना आघाडी व कॅाग्रेसच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.
उद्या अर्जाची छाननी होणार असुन १० जानेवारी रोजी माघारीची शेवट मुदत असल्याने त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
     अकोले नगरपंचायत निवडणूकीतील १३ प्रभागाची निवडणूक झाल्यानंतर कोर्टाच्या निर्देशानंतर ओ.बी.सी आरक्षित जागेवर सर्वसाधारण वर्गातून निवडणूक होत आहे येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होणार असुन आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
यामध्ये ३० डिसेंबर २०२१  रोजी १ व ३१ डिसेंबर २०२१ रोजी १ असे दोन व आज २० असे एकुण २२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
उमेदवार पुढीलप्रमाणे
 ३० डिसेंबर २०२१ रोजी प्रभाग १४ मधून  नाईकवाडी प्रकाश शंकर ( अपक्ष), ३१ डिसेंबर २०२१ रोजी प्रभाग क्र. ४ मधून  तांबोळी फैजान शमसुद्दीन ( भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस)
आज ३ जानेवारी २०२२ रोजी प्रभाग क्र. ४ मधून कुंभार हितेष रामकृष्ण ( भारतीय जनता पार्टी), योगेश मुकुंद जोशी ( भारतीय जनता पार्टी), दत्तात्रय चिमाजी भोईर ( अपक्ष), मैड श्रीकांत सुधाकर (शिवसेना ), मैड श्रीकांत सुधाकर ( अपक्ष ), योगेश मुकुंद जोशी (अपक्ष) ,
प्रभाग क्र. ११  मधून वैष्णवी सोमेश्वर धुमाळ ( भारतीय जनता पार्टी), वंदना भागवत शेटे ( राष्ट्रवादी कॅाग्रेस), वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (अपक्ष), वनिता रामदास शेटे (भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस),
प्रभाग क्र. १३ मधून सरला सचिन मोहिते ( भारतीय जनता पार्टी), खरात भीमाबाई सोमा (भारतीय जनता पार्टी), मोहिते जनाबाई नवनाथ (भारतीय जनता पार्टी), गायकवाड कीर्ती भारत ( भारतीय जनता पार्टी), लोखंडे आरती सुरेश (राष्ट्रवादी कॅाग्रेस), कर्णिक अंजली स्वप्निल ( भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस),
प्रभाग क्र १४ मधून नाईकवाडी राजेद्र यादव ( भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस), नवले शरद एकनाथ (भारतीय जनता पार्टी), पवार विजय बाबुराव (भारतीय जनता पार्टी), डमाळे पांडुरंग बाबुराव (राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी),
अशी ४ प्रभागातुन एकुण १९ व्यक्तीनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत .उद्या या अर्जाची छाननी होणार असुन १० जानेवारी २०२२ रोजी अर्ज माघारी घेण्याची शेवट मुदत असल्याने त्यानंतरच निवडणुकीतुन कोण माघार घेणार व किती जण लढणार हे स्पष्ट होईल.
मात्र सर्व प्रभागात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतु प्रभाग ४ व १३. मध्ये अपक्ष कायम राहिल्यास चाैरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!