नारायण इटप यांची पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् च्या उपाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी —
संगमनेर पद्मशाली समाज मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण इटप यांची पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् चे अध्यक्ष महेश कोठे तसेत सरचिटणीस गणेश पेनगोंडा यांनी दिले आहे.

संगमनेरात पद्मशाली समाजात अध्यक्ष तसेच सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी केलेल्या कामाची दखल पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् ने घेत त्यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी भविष्यात संघाच्या वतीने राबविल्या जाणार्या विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपेक्षित आहे.


आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून नारायण इटप यांनी नेहमीच समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. संगमनेर येथील पद्मशाली समाजाचे अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषविले आहे. त्याच बरोबर समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी कोरोना काळात सामाजातील गोर गरीब कुटुंबाला किराणा किटचे वाटप केले. त्यामुळे त्या कुटुंबांना मोठा आधार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी समाजासाठी अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले व धार्मिक कार्यक्रम देखील घेतले आहेत.

त्यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. प्रशांत वामन, संगमनेर जनसेवा समता युवक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव वलवे, संगमनेर पद्मशाली समजाचे अध्यक्ष गणेश मादास, उपाध्यक्ष शांताराम आडेप, हिरालाल पगडाल, पापय्या सिरसुल्ला, सुनील मादास, अरुण अमृतवाड, प्रकाश वन्नम, मधुकर वनम, अरविंद पगडाल, कोडुर सर, शंकर चन्ना, काशिनाथ आडेप, अंबादास आडेप, रवींद्र उडता, शेखर झुंजुर, नरेंद्र आडेप, सचिन अंकारम, दिनेश दासरी, प्रकाश शेराळ, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड, वनिता झुंजुर, कविता सिरसुल्ला, बजरंग दल जिल्हा संयोजक कुलदीप ठाकूर, युवा उद्योजक देवेंद्र लाहोटी, शिवसेनेचे उपशहरप्रमुख दीपक वनम, अर्जुन पवार यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


