साथी ॲड. निशा शिवूरकर यांची समाजवादी जन परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !

प्रतिनिधी —

समाजवादी जन परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी साथी ॲड. निशा शिवूरकर यांची पाटणा येथील राष्ट्रीय संमेलनात एकमताने निवड करण्यात आली आहे.

५ व ६ नोव्हेंबर रोजी समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय आधिवेशन बिहार मधील पाटणा येथे जल्लोषात संप्पन झाले. प्रतिनिधी स्वरूपात झालेल्या या आधिवेशना साठी देशातील विविध राज्यातील ११२ प्रतिनिधी उपस्थित होते.

आधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून साथी अरविंद अंजुम आणि साथी मंथन उपस्थित होते. या सत्राचे अध्यक्ष साथी लिंगराज आझाद हे होते.

यावेळी सर्व वक्त्यांनी देशातील महागाई, बेरोजगारी, आदिवासी, दलीत समुहांचे प्रश्न तसेच केंद्र सरकारच्या गरीब , शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विरोधी धोरणांचा आढावा घेतला. साथी रणजित यांनी या सत्राचे सुत्रसंचालन केले.

साथी चंद्रभूषण यांनी राजनैतिक आर्थिक प्रस्तावात करोना काळातील सरकारचे धोरण, देशातील गंभीर आरोग्य व्यवस्था, नरेंद्र मोदी यांनी अचानक जाहिर केलेल्या लॉकडावून मुळे लाखो कष्टकऱ्यांना भोगावे लागलेले विस्थापन, रुपयाचे अवमूल्यन, प्रचंड वाढलेलीविषमता, अदानी, अंबानी यांच्या संपतीत २०१४ पासून झालेली प्रचंड वाढ, रेल्वे, बीएसएनएल या सारख्या सार्वजनिक कंपन्यांची खाजगी उद्योकांना विक्री, वाढती बेरोजगारी विषयी मांडणी करण्यात आली.

तसेच वाढती सांप्रदायिकता, न्याय संस्था, निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणेतील सरकारच्या हस्तक्षेपाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. साथी कमल कृष्ण बॅनर्जी यांनी प्रस्तावास समर्थन दिले. प्रस्तावावर बोलतांना सर्वच वक्त्यांनी २०२४ मध्ये केंद्रात भाजप शासन येणार नाही यासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

देशातील समविचारी पक्ष संघटनांना एकत्र येण्याचं आव्हान यावेळी करण्यात आले.

साथी गंगाप्रसाद यांनी मांडलेल्या सामाजिक प्रस्तावात देशातील आदिवासी, दलीत समूह, स्त्रियांवरील अत्याचार, झुंडबळी, द्वेष फैलवणारी वक्तव्य याविषयी चर्चा करण्यात आली. देशातील सहिष्णू, संमिश्र संस्कृतीवर होत असलेल्या आक्रमणा विरुद्ध संघटित प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.

पुढील दोन वर्षांसाठी पदाधिकारी आणि कार्यकारीणी निवडण्यात आली. साथी ॲड. निशा शिवूरकर यांची अध्यक्षपदी तर महामंत्री म्हणून नियमगिरी संघर्ष आंदोलनाचे नेते साथी लिंगराज यांची व संघटन मंत्री म्हणून साथी अफलातून यांची निवड झाली.

साथी सुरेश, अतुल कुमार, नीरज कुमार व फागराम यांची आणि उपाध्यक्ष म्हणून साथी चंद्रभूषण चौधरी, रणजित रॉय यांची निवड झाली. त्याचप्रमाणे विविध राज्यातील प्रतिनिधि निवडण्यात आले.

१ ते १० डिसेंबर काळात देशभर, महागाई केंद्र सरकारच्या धोरणांविरुध्द कार्यक्रम आयोजित करण्याचा तसेच ३० जानेवारी २०२३ रोजी गांधी हत्येच्या दिवशी सांप्रदायिकते विरोधात व सद्भावना सर्व केंद्रावर धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

नुतन अध्यक्षा निशा शिवूरकर यांनी समारोपाच्या भाषणात लोकशाही समाजवादी चळवळीचा आढावा घेतला. तसेच देशातील गंगा जमनी तहजीब रक्षणासाठी निर्भयपणे संघटित प्रयत्न करण्याचे आव्हान केले .

ओरिसा येथील कार्यकर्त्यानी गायलेल्या क्रांतीगीताने आणि घोषणांचा गजर करत समारोप करण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!