तर…मला रॉयल्टी द्यावी लागेल — आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव निवडणूक आयोगाकडून मिळाले. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव मिळाले. मात्र बाळासाहेबांची शिवसेना या नावावरून सोशल मीडियातून उलट सुलट विनोदी चर्चा सुरू आहेत. आज माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे बाळासाहेब थोरात यांची शिवसेना का असा प्रश्न विचारला असता बाळासाहेब हे नाव वापरले आणि माझा फोटो लावला तर शिंदे गटाल मला रॉयल्टी द्यावे लागेल असे त्यांनी मिश्किल पणे सांगितले.

शिंदे गटाला आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलंय. शिंदे गटाला मिळालेल्या या नव्या नावावरुन सोशल मीडियावर क्रिएटिव्ह डोक्यांनी बनवलेल्या फोटोंनी धुमाकूळ घातलाय. त्यातच काल आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना या नावातील नेमके बाळासाहेब कोण? असा सवाल उपस्थित करुन शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

शिवसेना मध्ये वाद झाल्यानंतर दोन गट झाले. यातील शिंदे गटाने न्यायालयात आणि निवडणूक आयोगाने जाऊन शिवसेनेवर हक्क सांगितला होता. निवडणूक आयोगाने नुकतेच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावे आणि वेगवेगळे चिन्ह दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल असे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले आहे. पत्रकारांनी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना यावरूनच छेडले. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे नेमके कोणत्या बाळासाहेबांची शिवसेना ? बाळासाहेब थोरात यांची शिवसेना का असा सवाल करताच आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिंदे गटाने जर माझे नाव आणि फोटो वापरला तर त्यांना मला रॉयल्टी द्यावे लागेल असे मिश्किल पणे सांगितले तेव्हा उपस्थितीमध्ये एकच अशा उडाला.

एकंदरीत पाहता या गटातटाच्या भांडणावरून, शिंदे गटाच्या नावावरून बऱ्याच विनोदी चर्चा सोशल मीडियातून पसरवल्या जात आहेत. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचे छायाचित्र वापरून बाळासाहेब यांची शिवसेना, बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांचे छायाचित्र वापरून बाळासाहेबांची शिवसेना असे सोशल मीडियातून पसरवले जात आहे. एवढेच नव्हे तर मराठी सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी यांचे सिनेमातील छायाचित्र वापरून सुद्धा मिम्स तयार केले गेले आहेत.

तर दुसरीकडे शिंदे गटाची शिवसेना नेमकी कोणत्या बाळासाहेबांची ? याविषयी पण विनोदी चर्चा रंगल्या आहेत. बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे पाटील की बाळासाहेब आंबेडकर अशा मोठ्या नावांची विनोदी चर्चा होऊ लागली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!