संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुका शांततेत पार पाडल्याबद्दल RGSS ने पोलीस प्रशासनाचे मानले आभार.

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

नगरपालिकेच्या निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडल्याबद्दल पोलीस आणि प्रशासनाचे आभार राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना दिलेल्या निवेदनात त्याच्या वतीने म्हटले आहे की, संगमनेर नगर परिषदेची अलीकडेच पार पडलेली निवडणूक अत्यंत शांततेत, पारदर्शक व लोकशाही पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडली. सदर निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू न देता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांनी अत्यंत मेहनत, तत्परता व नियोजनबद्ध कार्य केले.

आपल्या मार्गदर्शनाखाली संगमनेर विभागातील संपूर्ण पोलीस यंत्रणेने सतर्क राहून, नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावला आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडू शकली.

या उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्याबद्दल संगमनेर विभागातील संपूर्ण पोलीस प्रशासन तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत.

रवींद्र हासे अरुण चव्हाण अरुण जाधव प्रकाश कडलग राम अरगडे सतीश खताळ अरुण गावित्रे अमोल शेलकर मोहसीन शेख कल्याण जोर्वेकर बाळासाहेब घोडके सोमनाथ हासे भरत कळस्कर संजय बागुल शंतनू भालेकर आधी यावेळेस उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!