आघाडी सरकारने जनतेवर काळ्या दिवाळीची वेळ आणली होती !

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

प्रतिनिधी —

ज्यांनी मागच्या अडीच वर्षाच्या काळात राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असून, ‘आनंदाच्या शिध्यावर’ बोलण्याचा नैतिकही अधिकार नसल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

राज्य ससकाने दिवाळी निमित्ताने लाभार्थींना आनंदाचा शिधा म्हणून शंभर रुपयात किराणा वस्तू दिल्या आहेत. राहाता शहरातील लाभार्थ्यांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी माध्यमांशी बोलतांना विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने जनतेच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे.आनंदाचा शिधा देणारे महाराष्ट्र राज्य हे एकमेव असल्याचे सांगून विखे पाटील म्हणाले की शासनाच्या या निर्णयावर आज महाविकास आघाडीचे नेते टिका करीत असले तरी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीहोती याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिंदे फडणवीस सरकार सतेवर आल्यांनतर ज्या पध्दतीने निर्णय होत आहेत त्यातून लोकांचे हित आम्ही साधत आहोत याकडे माध्यमांचे लक्ष वेधून महाविकास आघाडी सरकार फक्त दारूवरील कर कमी करण्यात मग्न होते असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नूकसानीचे पंचनामे करण्याचे सरकारने दिले असून झालेल्या नूकसानीची वस्तूस्थिती समोर आल्यानंतर मदतीचा निर्णय घेतला जाईल परंतू राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही याची खबरदारी सरकार निश्चित घेईल आशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार रोहीत पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला कोणाचेही घर फोडायला वेळ नाही. आशा पध्दतीची होणारी वक्तव्य ही केवळ सवंग लोकप्रियतेसाठी असून महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात राज्याची ज्या पध्दतीने अधोगती केली ती विकासाच्या प्रक्रियेतून भरून काढण्यावर आमचे लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!