अकोले तालुका फोटोग्राफर संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक नवले तर सचिव पदी प्रवीण नाईकवाडी
प्रतिनिधी ––
अकोले तालुका फोटोग्राफर संघटनेच्या अध्यक्ष पदी दीपक नवले तर सचिव पदी प्रवीण नाईकवाडी यांची एकमताने निवड करण्यात आली.
अकोले तालुका फोटोग्राफर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे मावळते अध्यक्ष नंदकुमार मंडलिक त्यांच्या अध्यक्षते खाली व संस्थापक अध्यक्ष संजय आवारी यांच्या उपस्थित पार पडली.

यावेळी माजी सचिव आनंद बिडवे यांनी सभेपुढे येणारे विषयाचे वाचन केले. तसेच संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी संदीप दातखिळे, सहसचिव संदीप हासे, खजिनदार सुरज पांडे, संपर्क प्रमुख प्रथमेश तुपे, प्रसिद्धी प्रमुख रोहिदास ढोन्नर तर सदस्य पदी जिजाबा कानवडे, प्रकाश भालेराव, सचिन तांबे बाळासाहेब वाकचौरे, किशोर आवारी व अमित नाईकवाडी यांची सर्वानामुते निवड करण्यात आली.

यावेळी कोल्हापूर येथील फोटो आर्टिस्ट मिथीलेश लोखंडे यांचे उपस्थित छायाचित्रकारांना मार्गदर्शन लाभले. जेष्ठ फोटोग्राफर विलास तुपे, राजेंद्र मालुंजकर, संतोष नवले, संदीप देशमुख, गणेश गभाले, संतोष भांगरे, विजय मंडलिक, जयराज मंडलिक, शाम सहाणे, शुभम डुंबरे, स्वप्निल गायकवाड व सर्व फोटोग्राफर उपस्थित होते. तसेच सर्व सभासदांना बरोबर घेऊन आगामी काळात संघटनेच्या हिताचे कार्यक्रम घेतले जातील असे प्रतिपादन अध्यक्ष दीपक नवले यांनी केले. आभार विवेक मोहिते यांनी मानले.

