आई वरून शिवी दिल्याने चुलत भावाचा केला खून
प्रतिनिधी —
चुलत भावाने आईवरुन शिव्या दिल्याने राग अनावर झाल्याने भावानेच चुलत भावाचा दगडाने मारून खून केल्याची घटना विजयादशमीच्या दिवशी अकोले तालुक्यातील खडकेवाडी येथे घडली आहे.
बारकू दामू गिरे असे मयताचे नाव असून काशिनाथ सोमनाथ गिरे असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत अकोले पोलिस स्टेशनला मयताची पत्नी इंदुबाई बारकू धीरे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे कि, दसऱ्याच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास फिर्यादीच्या घराच्या ओटयाचे जवळ काशिनाथ सोमनाथ गिर्हे (खडकेवाडी, देवठाण तालुका अकोले) त्याचा चुलत भाऊ फिर्यादीचे पती बारकू दामु गिर्हे यांनी आई वरून शिवीगाळ केली याचा राग आल्याने काशिनाथ सोमनाथ गिर्हे याने चुलत भाऊ असलेल्या बारकू दामु गिर्हे यांना खाली पाडून त्याचा दगडाच्या गोट्याने मारून खून केला. फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत गु.र.न. 456/2022 भा.द.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक मिथुन घुगे करत आहेत.

