गांजा तस्करी करणारी टोळी पकडली !

नारळांच्या पोत्यांत २ कोटींचा ९०० किलो गांजा ! मुख्य सूत्रधार संगमनेरचा ; चौघांना अटक

प्रतिनिधी —

गांजा तस्करी करणारी नगर जिल्ह्यातील टोळी तेलंगणा पोलिसांनी पकडली असून या टोळीमध्ये संगमनेरचे तीन आरोपी आहेत. ओडिशा राज्यातून नारळाच्या पोत्यांमध्ये गांजा लपवून नगरकडे येत असताना पोलिसांनी या टोळीवर छापा टाकून त्यांना अटक केली आहे. यातील मुख्य सूत्रधार देखील संगमनेरचा असल्याचे समोर आले आहे.

विकास बबन साळवे (रा. सुकेवाडी रस्ता, संगमनेर) विनोद चंद्रभान काळकर (रा. रांजणगाव देशमुख, ता. कोपरगाव) किशोर तुळशीराम वाडेकर (रा. संगमनेर) व कोसाचिट्टी बाबू (ओडिशा) या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर या टोळीचा मुख्य सूत्रधार योगेश दत्तू गायकवाड (रा. संगमनेर) हा फरार आहे.

३ ऑक्टोबर २०२२ रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळी कडून ५ मोबाईल, ३ हजार १०० रुपये रोख, सुमारे २ कोटी रुपये किमतीचा ९०० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही टोळी मलकानगिरी, (ओडिशा) येथून आयशर ट्रक क्रमांक एमएच १४ सीपी ८६९८ या गाडीतून गांजा घेऊन हैदराबाद मार्गे महाराष्ट्रात नगर जिल्ह्याकडे येत होती. मात्र तेलंगणा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन टीम (SOT) ने ही गाडी पकडली आणि टोळीतील चार जणांना अटक केली.

यापूर्वी देखील असे गुन्हे या टोळीने केल्या असल्याचे उघड झाले आहे. या छाप्यामुळे गांजा आणि अमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी सापडून येण्याची शक्यता आहे. सर्व आरोपींवर NDPS ॲक्ट 1985 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे या टोळीचा मुख्य सूत्रधार योगेश गायकवाड हा संगमनेरचा असल्याचे उघड झाले आहे. ही टोळी नगर जिल्ह्यात कोठे कोठे गांजा वितरित करणार होती याचाही तपास तेलंगणा पोलीस करणार आहेत. तेलंगणातील पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली.

संगमनेर अवैध धंद्यांचे केंद्र !

संपूर्ण नगर जिल्ह्यात गांजा तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे नेहमीच उघड झालेले आहे. गांजा तस्करीचे केंद्र संगमनेर असल्याचे देखील अनेक वेळा समोर आले आहे. मुंबई, ठाणे क्राईम ब्रँच, नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक, नगर गुन्हे अन्वेषण शाखा यांनी देखील संगमनेराज छापे मारून गांजा तस्करांना पकडले आहेत. आणि कारवाया केल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यासाठी कु -प्रसिद्ध म्हणून संगमनेर नावा रुपाला आलेले आहे. सर्व प्रकारचे अवैध धंदे संगमनेरात मोठ्या जोमाने सुरू असल्याचे उघड होत असते. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत येथील पोलीस अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या भूमिकां नेहमीच संशयास्पद राहिलेल्या आहेत. त्यामुळे संगमनेर पोलिसांच्या कार्यपद्धतिची देखील राज्य सरकारच्या गृह विभागाने चौकशी करायला हवी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!